मुंबई : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने आज विशेष अधिवेशनाचं आयोजन केलं आहे. मागासवर्ग आयोगाने घेतलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात मांडणार आहेत. त्याआधी या अहवालाला राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. तसेच मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा मुसदा देखील काढण्यात आला आहे. परंतु जोपर्यंत सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी होत नाही. तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. असे म्हणत मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
हेही वाचा…धक्कादायक…! “शांतताप्रिय पुणे शहारात गुंडगिरीचा थैमान, जिंवत महिलेला पेट्रोल टाकून झाळले,”
मराठा समाजाकरिता १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु मनोज जरांगे पाटलांनी याला विरोध केला आहे. आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण दिलं पाहिजे. तेपण ५० टक्क्यांच्या आत हवं आहे. आम्हाला हे १० टक्के आरक्षण नकोय. त्यामुळे ओबीसीमधूनच आम्हाला आरक्षण देण्यात यावेत. हीच आमची प्रथमच मागणी आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे. अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे.
हेही वाचा…“मराठा आरक्षणाबाबत अधिवेशन घेऊन काहीच होणार नाही”, राज ठाकरेंचं रोखठोक मत
दरम्यान, राज्य सरकारने सगेसोयऱ्यांची आज अंमलबजावणी करण्याची मागणी मान्य न झाल्यास उद्या लगेचच आम्ही आंदोलनाची पुढची दिशा ठरवू, असा इशारा देखील जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिला आहे. १० टक्के आरक्षण ज्याला घ्यायचं असेल तो घेईल. कॅबिनेटमध्ये याला मंजुरी मिळाली असली तर तुम्हाला अजून निर्णय घेण्यास वेळ आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे. अधिवेशनात सगेसोयऱ्यांची मागणी घेतात की नाही. ते आम्ही आज पाहणार आहोत. जर मागणी केली नाही. तर आम्ही लगेचच आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार. असेही त्यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…मराठा आरक्षणाचा अखेर सुर्य उगवला..! “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण मंजुर
हेही वाचा…“राज्यसभेतून पत्ता कट, लोकसभेला इच्छूक नाही,” नारायण राणेंच्या मनात नेमकं काय ?
हेही वाचा.चंद्रपुर लोकसभेत वडेट्टीवार विरूद्ध मुनगंटीवार यांच्यात होणार सामना ? निवडणुक लढण्याचे दिले संकेत
हेही वाचा“आमचा पक्ष फुटला आहे, आता…,” जयंत पाटील यांचं महत्वाचं वक्तव्य
हेही वाचा…शरद पवार गटाला कोर्टाचा मोठा दिलासा, तर अजित पवार गटाला सुनावले खडेबोल, कोर्टात नेमकं काय झालं?