मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्याकरिता राज्य सरकारने आज विशेष अधिवेशनाचं आयोजन केलं आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत एक विधेयक मांडून त्यावर दोन्ही सभागृहात चर्चा आणि मंजूर करण्यात येणार आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने १० दिवस मराठा समाजाच्या मागासलेपणाबाबत सर्वेक्षण केलं होतं. त्या सर्वेक्षण अहवाल आज विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मांडणार आहेत. या अहवालानुसार मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण देण्याबाबत शिफारस केली जाणार असून १० ते १३ टक्क्यांच्या दरम्यान आरक्षण मराठा समाजाला दिलं जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“मराठा आरक्षणाबाबत अधिवेशन घेऊन काहीच होणार नाही”, राज ठाकरेंचं रोखठोक मत
विशेष अधिवेशनाच्या पुर्वी राज्य मंत्रीमंडळाची बैठक होत आहे. या बैठकीत हा सर्वेक्षण अहवाल सादर केला जाणार असून याला याठिकाणी मंजुर मिळण्याची शक्यता आहे. या अहवालाच्या आधारे मराठा समाजाला किती टक्के आरक्षण दिलं जावं, याबाबत मंत्रिमंडळ शिफारस करणार आहेत. मराठा समाजाला नोकरी मध्ये १० टक्के आरक्षण देण्यात आल्याची मंजुरी देण्यात आली आहे.
हेही वाचा…तुम्हीही भाजपमध्ये प्रवेश करणार का ? भाजपप्रवेशाबाबत जयंत पाटलांनी सोडलं मौन.. म्हणाले…
मराठा आरक्षणाबाबत मसुदा समोर आला आहे. या मुसद्यात भारताच्या संविधानानुसार खंड एकच्या अल्पसंख्यांक व्यक्तिरिक्त इतर शैक्षणिक संस्था तसेच खासगी शैक्षणिक संस्थामध्ये एकूण जागांच्या १० टक्के आणि राज्याच्या पदासंदर्भात तसेच सरळसेवा भरतीच्या एकूण नियुक्त्याच्या 10 टक्के आरक्षण सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी स्वतंत्र पणे राखून ठेवण्यात येईल. परंतु भारताच्या संविधानाच्या पाचव्या अनुसुची अन्वय याबाबतीत राज्यपालांनी वेळोवेळी काढलेल्या अधिसुचनेनुसार राज्याच्या अनुसुचीत क्षेत्रांमध्ये अनुसुचीत जमातींच्या करिता वरील आरक्षण लागू होणार नाही.
READ ALSO :
हेही वाचा…“राज्यसभेतून पत्ता कट, लोकसभेला इच्छूक नाही,” नारायण राणेंच्या मनात नेमकं काय ?
हेही वाचा.चंद्रपुर लोकसभेत वडेट्टीवार विरूद्ध मुनगंटीवार यांच्यात होणार सामना ? निवडणुक लढण्याचे दिले संकेत
हेही वाचा“आमचा पक्ष फुटला आहे, आता…,” जयंत पाटील यांचं महत्वाचं वक्तव्य
हेही वाचा…शरद पवार गटाला कोर्टाचा मोठा दिलासा, तर अजित पवार गटाला सुनावले खडेबोल, कोर्टात नेमकं काय झालं?
हेही वाचा…धक्कादायक…! “शांतताप्रिय पुणे शहारात गुंडगिरीचा थैमान, जिंवत महिलेला पेट्रोल टाकून झाळले,”