पुणे : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्याआधी मराठा आरक्षणाच्या मसुद्याला कॅबिनेटने मंजुरी दिली. यानुसार आता मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात दहा टक्के आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यावर आता भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“मुख्यमंत्री साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने खोटं बोलू नका..!!” शिंदेंनी मराठा समाजाला फसवलं
मागच्या वेळी सरकारने मराठा समाजाला दिलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकलं नव्हतं. त्यामुळे यावेळी त्याची योग्य ती काळजी घेऊन तसेच सर्वोच्च न्यायलयात मराठा आरक्षण टिकेल. अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकेल अशी भूमिका घेऊन मराठा समाजाला न्याय देण्याचं काम करण्यात आलं आहे. असे महेश लांडगे म्हणाले.
मागच्या ४० ते ४२ वर्षापासून मराठा समाजाचा लढा आज यशस्वी झाला आहे. सरकारच्या बाजूने मराठा आरक्षणाबाबत योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही टिका केली तरी हे आरक्षण कोर्टात टिकणार आहे. असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा…मोठी बातमी….! मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मंजूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात नेमकं काय म्हणाले ?
राज्य सरकारने मराठा समाजाचा सर्व अभ्यास करून अहवाल तयार केला आहे. त्यामुळे मराठा समाजाला सामाजिक तसेच शैक्षणिक संदर्भात भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन जी घोषणा केली होती, ती पुर्ण केली आहे. असेही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“आता जाहिराती निघतील, मंजुर झालेलं आरक्षण लागू होणार का ?” देवेंद्र फडणवीसांनी दिली मोठी प्रतिक्रिया
हेही वाचा…“निवडणुकीच्या तोंडावर केवळ मतं मिळवण्यासाठी सरकारची नौटंकी”, वडेट्टीवारांचा हल्लाबोल
हेही वाचा…ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले पहिल्यांदाच आभार म्हणाले, “ज्या निर्दयीपणाने डोकी फोडली..”
हेही वाचा…“गाढवाचा गोंधळ व लाथांचा सुकाळ”, अन् म्हणे मंत्री, नारायण राणेंचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत
हेही वाचा…मनोज जरांगे पाटलांचा मराठा समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाला विरोध का ? उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार