बारामती : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महत्वाच्या पक्षांनी तयारी करण्यास सुरूवात केलीय. यातच ठाकरे गटाकडून काल बारामती, शिरूर, आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत कार्यकर्त्यांना महत्वाच्या सुचना देण्यात आल्या.
हेही वाचा…शेतकऱ्यांनी धनंजय मुंडेंना घातला गराडा, मुंडेंवर प्रश्नांची केली सरबत्ती
बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांची काल मातोश्रीवर बैठक पार पडली. यावेळी स्थानिक नेत्यांकडून बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी बारामतीत सुप्रिया सुळे यांना ताकद द्या, तसेच कोणताही उमेदवारी दिला तरी त्याला निवडून आणण्यासाठी जोर लावा, अशा सुचना काल उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिल्या.
हेही वाचा…महाराष्ट्राचे सर्व भाजप आमदार परराज्यात जाणार, लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी
दरम्यान, खडकवासला विधानसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाला उमेदवारी मिळावी, अशी इच्छा स्थानिक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी यावेळी ठाकरेंजवळ बोलून दाखविली. इंडिया आघाडीमध्ये आपण आहोत, बारामतीत सुप्रिया सुळेंना पक्षाकडून ताकद द्या, सुप्रिया सुळेंना साथ द्या. असंही ठाकरेंनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवार गट राज्यात सक्रीय, ३६ जिल्ह्यांची जबाबदारी राष्ट्रवादीच्या ‘१०’ मोठ्या नेत्यांवर
हेही वाचा…मोठी बातमी…! महाराष्ट्राचे ५० तडपदार आमदार मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी ५० उमेदवार ठरवणार
हेही वाचा…“गृहमंत्र्यांनी पक्ष फोडणे बंद करुन पेपर फोडणाऱ्यांचे कंबरडे मोडावे”
हेही वाचा…“..त्यामुळे भाजपबरोबर गेलेला कोणताही लोकनेता टिकू शकत नाही”, रोहित पवारांची भाजपवर जहरी टिका
हेही वाचा…शिवसेनेच्या आमदारांची सुनावणी कधी घेणार, ? राहुल नार्वेकरांनी दिलं उत्तर