मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना भडकवल्या प्रकरणी सध्या अटकेत असलेल्या अॅड गुणरत्ने सदावर्तेंना यांच्यावर आता सोलापूरात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात कलम 153 अ, ब, 500, 503,506,507 कलमानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात छावाचे योगेश पवार यांनी तक्रार दिली आहे. तसेच आता त्यांना न्यायालयाने 14 दिवसांची कोठडी देखील न्यायालयीन कोठडी दिली आहे.
“मागील 50 वर्ष शिवसेना वादळाशी संघर्ष करत इथपर्यंत पोहोचलीय”; संजय राऊतांचं राणेंंना प्रत्युत्तर
मुंबईतील गिरगाव येथील न्यायालयाने सदावर्तेंना कोठडी सुनावली आहे. यावेळी गुणरत्ने सदावर्ते यांनीच न्यायालयात युक्तिवाद लढवला. त्यावेळी ते म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी 200, 300 रूपये मी मर्जीनं घेतले. एवढे कमी पैसे कोणता वकिल घेतो ते पोलिसांनी सांगावं. असं गुणरत्ने सदावर्तेंनी म्हटलं आहे. त्याचबरोबर माझ्याकडे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांपैकी 48 हजार क्लायंट होते, असाही युक्तिवाद त्यांनी लढवला.
“राज ठाकरेंचं सोयी अन् सुपारीनुसार पोकळ हिंदुत्व”; मनिषा कांयदे यांचा राज ठाकरेंना टोला
एकीकडे गिरगाव सदावर्तेंना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आता कोल्हापुर पोलीस गुणरत्ने सदावर्तेंचा ताबाब मागण्याच्या तयारीत आहेत. कोल्हापुरात मराठा समाजाबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांसंदर्भा चौकशी कऱण्यासाठी कोल्हापुर पोलीस मागणार ताबा घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
“उद्धव ठाकरे जून महिन्याच्या अगोदर मुख्यमंत्रिपदावरून जाणार”; नारायण राणेंची भविष्यवाणी
दरम्यान, गुणरत्ने सदावर्ते यांना अलिकडेच पोलिसांनी 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यावर सदावर्ते यांच्याबाबत न्यायालयात युक्तिवाद झाला. मात्र जामीन अर्जावर निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला. मंगळवारी याबाबत निर्णय झाला नाही. न्यायालयाने सदावर्ते यांना सातारा शहर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात 15 हजार रूपयांचा जामीन मंजूर कऱण्यात आला आहे.
Read also:
- गुणरत्ने सदावर्तेंना अखेर जामीन मंजूर! सातारा जिल्हा न्यायालय सुनावणीत
- राज ठाकरेंना ‘अर्थवटराव’ म्हटल्यानंतर मनसेकडून मुंडेंना जोरदार प्रत्युत्तर! म्हणाले, तात्या विंचू…;
- गणेश नाईकांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता! मुंबई पोलिसांचा शोध सुरू
- संजय राऊतांना ‘ते’ व्यक्तव्य भोवण्याची शक्यता! न्यायालयात अवमान याचिका दाखल
- “राज ठाकरेंसोबत भाजप गेल्यास त्यांना महागात पडेल”; रामदास आठवलेंनी दिला इशारा