मुंबई : नवी मुंबईतील ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात एका महिलेने तक्रार दाखल केली आहे. 2021 मध्ये गणेश नाईक यांनी आपल्यावर बंदुक रोखून जीवे मारण्याची धमकी दिली होती. असा आरोप संबंधित महिलेने केला आहे. मी गणेश नाईक यांच्यासोबत 27 वर्षापासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. यामधून आम्हाला एक मुलगा देखील झाला आहे. या मुलास त्यांच्या वडिलांचं नाव दिलं जाव अशी मागणी त्यांच्याकडे मी केली. मात्र गणेश नाईक यांनी मला बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचं त्या महिलेने म्हटलं आहे. त्यामुळे गणेश नाईक यांना आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.
“आमच्या रक्तात हिंदूत्त्व, त्यासाठी कोणतीही शाल पांघरण्याची गरज नाही”; देवेंद्र फडणवीस
गुन्हा दाखल करून चार ते पाच दिवस उलटले आहेत तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात न आल्याने राष्ट्रवादी आणिी शिवसेनेच्या महिला आक्रमक झाल्या आहेत. मुंबईत त्यांनी गणेश नाईक यांच्याविरोधात आंदोलन देखील केलं आहे. त्यामुळे आता गणेश नाईक यांचा शोध घेतला जात असून त्यांना कोणत्याही क्षणी बेड्या ठोकल्या जाण्याची शक्यता आहे. कोपरखैरणे येथील घर आणि कार्यालय तसंच मुरबाडमधील फार्म हाऊसवर देखील पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
“मी कोणाचे नाव घेत नाही, फक्त टोपी फेकतो”; शरद पवारांचं नाव न घेता चंद्रकांत पाटलांचा टोला
संबंधित महिलेने या प्रकऱणी सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्याशिवाय या महिलेकडून राज्य महिला आयोगाकडे देखील तक्रार करण्यात आलेली आहे. तर गणेश नाईक यांनी स्वत: ची डीएनची चाचणी करून यावर स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.
“जिथं तुमच्या नेत्याला सुरक्षा पुरवू शकत नाही, तिथं सामान्य माणसाची काय कशा ?”
दरम्यान, संबंधित तक्रार महिला 1993 मध्ये वाशी सेक्टर-17 मधील बिग फ्लॅश स्पोर्ट्स क्लब येथे रिसेप्शनिस्ट म्हणून काम करीत होती. यावेळी नाईक वारंवार क्लबमध्ये बैठकीसाठी येत असत. त्यावेळी त्या महिलेशी गणेश नाईक यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर 1195 पासून मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. त्यावेळी नाईक यांनी मला पारसिक हिल येथील बंगल्यात नेऊन शरीरसंबंध प्रस्थापित केले. पुण्यात फिरण्यासाठी गेल्यानंतरही आणच्यामध्ये संमतीने शरीरसंबंध प्रस्थापित झाले असल्याचे त्या महिलेेने तक्रारीत म्हटलं आहे.
Read also:
- संजय राऊतांना ‘ते’ व्यक्तव्य भोवण्याची शक्यता! न्यायालयात अवमान याचिका दाखल
- “राज ठाकरेंसोबत भाजप गेल्यास त्यांना महागात पडेल”; रामदास आठवलेंनी दिला इशारा
- “मागील 50 वर्ष शिवसेना वादळाशी संघर्ष करत इथपर्यंत पोहोचलीय”; संजय राऊतांचं राणेंंना प्रत्युत्तर
- “राज ठाकरेंचं सोयी अन् सुपारीनुसार पोकळ हिंदुत्व”; मनिषा कांयदे यांचा राज ठाकरेंना टोला
- “उद्धव ठाकरे जून महिन्याच्या अगोदर मुख्यमंत्रिपदावरून जाणार”; नारायण राणेंची भविष्यवाणी