मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना भडकवण्याप्रकरणी वकिल गुणरत्ने सदावर्ते यांना तुरूंगात डांबण्यात आलं होतं. त्यावेळी ते राज्याच्या राजकारणात चांगलचे चर्चेत आले होते. यातच त्यांची स्वंतत्र विदर्भ व्हावा, अशी मागणी लावून धरल्यानंतर त्यांच्यावर शाई फेक देखील करण्यात आली होती. त्यामुळे गुणरत्ने सदावर्ते सातत्याने चर्चेत राहिले आहेत. यातच त्यांच्या घरी गाढव देखील असून गाढव घरी का पाळले आहे. याचे स्पष्टीकरण आज गुणरत्ने सदावर्ते यांनी दिलं आहे. त्यांनी टीव्ही9 ला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.
त्यावर त्यांना विचारण्यात आल्यानंतर ते म्हणाले की, आमच्या घरात गाढव माझ्या मुलीने पळाले आहे, त्याचं नाव मॅक्स आहे आणि गाढवाचे दुध पोटदुखीवर औषध आहे, ते सहज उलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे मुलीने ते पाळलं आहे, हा संधोधनाचा भाग आहे, म्हणून घरी गाढव पाळलं आहे, असं त्यांनी सांगितलं.
“मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारचा खोटारडेपणा उघड केला”; सीमावादावर राष्ट्रवादीची टिका
गुणरत्ने सदावर्ते यांच्या मुलीचं नाव झेन सदावर्ते असून त्या मुलीनेच ते गाढव पाळले असल्याचंही सदावर्ते यांनी सांगितले. तसेच सदावर्ते यांच्या कुटुंबाला प्राणी, पक्षी पाळण्याचा छंद आहे, घरात कुत्रे, गाढव, कबुतरे असे नियमात असणारे पशू पक्षांचे पालन करीत असल्याचंही त्यांनी यावेळी नमुद केलं. तसेच त्यांना कुत्रे पाळण्याचीही आवड होती. तशीच आवड माझ्या मुलीला झाली असल्यांनी त्यांनी सांगितले.
Read also
- चंद्रकांत पाटलांचा तो विषय…! भुजबळांनी झोळी पसरवली, फडणवीसांनी थेट पुस्तकच वाचलं
- “अरे संजय बेटा….! थांब जरा, माझं ऐक, खाली बस्..;”अन् अजित पवारांनी सभागृहातच
- फोटो मॉर्फचा मुद्दा विधानसभेत..! जयंत पाटलांनी फोटोच दाखवून भाजपला पकडलं कोंडीत” भुजबळही हसले
- निमगाव चोभा ग्रामपंचायतीत कानिफनाथ ग्रामविकास पॅनलचा दणदणीत विजय
- “पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे नवे राष्ट्रपती”, अमृता फडणवीसांचं वक्तव्य