नागपुर : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सभागृहात अनेक राजकीय घडामोडी बघायला मिळाल्या. राज्यातील अनुदानित शाळा, शिक्षक भरती, वेतन यासंदर्भात चर्चा सुरू होती. यावरून छगन भुजबळ यांनी शाळा चालवण्यासाठी निधी जमा करण्यासाठी भीक मागणे गरजेचे आहे का ? असा सवाल करीत चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकातील आशाय वाचून दाखविला.
“मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारचा खोटारडेपणा उघड केला”; सीमावादावर राष्ट्रवादीची टिका
छगन भुजबळ यांनी सभागृहात थेट आपल्याकडील मफलर पसरवून चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल केला. त्याला प्रत्युत्तर देतांना फडणवीसांनी प्रबोधनकार ठाकरे यांचे माझी जीवनगाथा पुस्तकातील आशाय वाचून दाखविला. त्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांनी कशा पद्धतीने शाळा चालविल्या. त्यासाठी पैसा कसा जमवला. याचे वाचन फडणवीसांनी केले. त्यावरून सभागृहात एकच गोंधळ उडाला.
“संजय राऊत पिसाळलेला कुत्रा, त्याला ठेचल्याशिवाय राहणार नाही”; संतोष बांगरांनी दिली धमकी
फडणवीसांनी पुस्तक वाचून दाखविल्यानंतर विरोधकांनी गोंधळ घातला. चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा तुम्ही समर्थन करत आहात असा सुर विरोधकांनी लावून धरला. त्यावर फडणवीसांनी मुळ मुद्यावरून कुणालाही आता शाळा चालवण्यासाठी भीक मागण्याची गरज येणार नाही. त्यावर राज्य सरकार योग्य ती काळजी घेईल असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला हाणला.
TET घोटाळा..! मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांच्या मुलांचा समावेश, विरोधकांनी मुद्दा ताणला
दरम्यान, शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील चंद्रकांत पाटलांवर यावरून कडाडून टिका केली होती. त्यानंतर ज्यावेळी उद्धव ठाकरे नागपूरात दाखल झालेत. त्यावेळी चंद्रकांत पाटलांनी त्यांची भेट घेऊन प्रबोधनकरांचे पुस्तक भेट दिले होते. याचे फोटो देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेत.
Read also
- “अरे संजय बेटा….! थांब जरा, माझं ऐक, खाली बस्..;”अन् अजित पवारांनी सभागृहातच
- फोटो मॉर्फचा मुद्दा विधानसभेत..! जयंत पाटलांनी फोटोच दाखवून भाजपला पकडलं कोंडीत” भुजबळही हसले
- निमगाव चोभा ग्रामपंचायतीत कानिफनाथ ग्रामविकास पॅनलचा दणदणीत विजय
- “पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे नवे राष्ट्रपती”, अमृता फडणवीसांचं वक्तव्य
- ऐतिहासिक निर्णय : पिंपरी-चिंचवडकरांची शास्तीकरातून अखेर मुक्ती…! भाजपा आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा