नागपूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी देखील त्यांच्या विधानसभेत सीमावादाचा मुद्द्यावर भाष्य केलं. महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नसल्याचं त्यांनी पुन्हा एकदा विधान केलं आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेट ही फक्त कायदा व सुव्यवस्थेसंबंधी होती. असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर जहरी टिका केली आहे. यावर प्रत्युत्तर देतांना बंडखोर आमदार संतोष बांगर यांची जीभ घसरली आहे.
“भाजप व शिंदे गटाची गावात इज्जत राहिली नाही, फडणीसांच्या त्या गावातही भाजपचा पराभव”
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा वादावर भाष्य केलं आहे. त्यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री रोज उठून महाराष्ट्राच्या कानफाटात मारतात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गाल चोळत विधिमंडळात जातात, असं म्हणत संजय राऊतांनी शिंदेंवर घणाघात केला. तसेच त्यांनी सीमाप्रश्न जरी जुना असला तरी सुद्धा एकमेकांच्या राज्याबद्दल आदरभाव ठेऊन बोललं गेलं पाहिजे. असंही राऊत म्हणाले.
“महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी बृजभुषण सिंह मुंबईत येणार, पाठपुरावा करतेय,”
संजय राऊतांच्या टिकेला उत्तर देतांना संतोष बांगर यांची जीभ घसरली, ते म्हणाले की, संजय राऊत हा पिसाळलेला कुत्रा आहे. त्याच्या कानशिलात मारल्याशिवाय राहणार नाही. ते जर आमच्या मंत्र्यांबद्दल असं विधान करत असतील तर ते ज्याठिकाणी भेटतील त्याठिकाणी टेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही. अशी धमकी देखील संतोष बांगर यांनी दिली आहे.
Read also
- TET घोटाळा..! मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांच्या मुलांचा समावेश, विरोधकांनी मुद्दा ताणला
- पिंपरी-चिंचवडच्या शास्तीकराचा प्रश्न विधानसभेच्या पटलावर..! आमदार महेश लांडगे यांनी लक्ष वेधले
- मुख्यमंत्री जोरात…! पहिल्या दिवशी मागणी, लगचेच दुसऱ्या दिवशी हिरकणी कक्ष
- “भुखंडावर श्रीखंड खाणारे आम्ही नाहीत”, सभागृहात फडणवीसांचं विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर
- “आमचा मोर्चा नॅनो नाही तर फडणवीस साईज…!” ठाकरेंचं फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर