नागपूर : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाची सुरूवात दमदार झाली आहे. विरोधी पक्षांनी पहिल्याच दिवशी महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रश्न लावून धरला. तर राज्यातील आमदारांच्या वेगवेगळ्या कृतींनी समाज माध्यमांचं लक्ष्य वेधून घेतलं. यातच नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनी आपल्या अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन विधानभवनात प्रवेश केला. तसेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हिरकणी कक्ष स्थापन करण्याची मागणी केली. त्यावर लगचेच निर्णय घेत नागपूर येथील विधानभवनात हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आलं.
भुखंडचा वाद सभागृहात पेटला..! फडणवीस, पाटील, भुजबळ एकमेकांत लढले, अध्यक्षांची तारांबळ
विधिमंडळांच्या विस्तारीत इमारतीमध्ये काल हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला. हिवाळी अधिवेशनासाठी तान्हुल्यासह आलेल्या आमदार सरोज अहिरे यांना बाळाची काळजी घेता यावी, यासाठी विधानभवनात हिरकणी कक्षाची सुरूवात करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, आणि शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत आमदार सरोज अहिरे यांच्याच हस्ते उद्घाटन करण्यात आले.
“खुद्द उर्जामंत्री बोलत असताना सभागृहात बत्ती गुल..! बल्ब, माईक सभागृह शांत
नोकरदार महिलांना त्यांच्या लहान मुलांची काळजी, स्तनपान करता यावे याकरीता कार्यालयांमध्ये हिरकणी कक्ष आहेत. अधिवेशनाच्या दरम्याने सरोज अहिरे यांंना त्यांच्या बाळाची काळजी घेता यावी, यासाठी नागपूर येथील विधीमंडळाच्या विस्तारीत इमारीतील दालन क्रमांक 106 मध्ये हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत निवडणुक निकाल, दोन गट भिडले, भाजपच्या कार्यकर्त्यांचा मृत्यू
आरोग्य विभागाच्या माध्यमातूून त्याचे कामकाज केले जात असून याठिकाणी स्वतंत्र खोली, पाळणा, वैद्यकीय, सुविधा आहेत. या कक्षासाठी एक डॉक्टर, दोन नर्स अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
Read also
- “भुखंडावर श्रीखंड खाणारे आम्ही नाहीत”, सभागृहात फडणवीसांचं विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर
- “आमचा मोर्चा नॅनो नाही तर फडणवीस साईज…!” ठाकरेंचं फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर
- “भाजप व शिंदे गटाची गावात इज्जत राहिली नाही, फडणीसांच्या त्या गावातही भाजपचा पराभव”
- “महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी बृजभुषण सिंह मुंबईत येणार, पाठपुरावा करतेय,”
- गोपीचंद पडळकरांच्या मोताश्री विजयी, गोपीचंद पडळकरांचा थेट फोन