नागपूर : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही मोठा गोंधळ बघायला मिळाला. सकाळी अधिवेशन सुरू होण्याच्या अगोर सत्ताधारी आणि विरोधक पायऱ्यांवर एकमेकांमध्ये जोरदार भिडले, यावेळी दोन्ही बाजूंनी मोठ्या घोषणा देण्यात आल्या. तर सभागृहात देखील मोठा गोंधळ बघायला मिळाला. यातच उर्जामंत्री बोलत असताना लाईट गेल्याने सभागृहात सर्व कामकाज बंद पडलं. यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी निशाणा साधला आहे.
“महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपचं नंबर 1 चा पक्ष राहणार”; फडणवीसांचा विश्वास
सध्या उर्जा मंत्र्यांचा विभाग देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याने वीज बिलाबाबत बोलण्यासाठी फडणवीस उभे राहिले असता. अचानक लाईट गेल्याने थोडा गोंधळ उडाला. यावरून राहित पवारांनी ट्विट केलं आहे. वीज गेल्यावर कशी अडचण होते, हे आज संपुर्ण सभागृहाला प्रत्यक्ष अनुभवता आलं. खुद्द उर्जामंत्री बोलत असतानाच वीज गेल्याने बल्ब, माईक बंद पडून कामकाजही बंदी पडलं. असं रोहित पवारांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
सेनेचा बडा नेता पहिल्यांदाच काॅंग्रेसच्या कार्यालयात, मविआची बैठक, ठाकरे उपस्थित
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, आपल्या बळीराजाला व छोट्या उद्योगांना तर मिनिटा मिनिटाला विजेसाठी झुंजावं लागतं. यानिमित्त तरी सरकार त्याची दखल घेईल का ? असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे सभागृहात यावरून वादही निर्माण होण्याची शक्यता आहे.
वीज गेल्यावर कशी अडचण होते, हे आज संपूर्ण सभागृहाला प्रत्यक्ष अनुभवता आलं. खुद्द ऊर्जामंत्री बोलत असतानाच वीज गेल्याने बल्ब, माईक बंद पडून कामकाजही बंद पडलं..
आपल्या बळीराजाला व छोट्या उद्योगांना तर मिनिटामिनिटाला विजेसाठी झुंजावं लागतं! यानिमित्त तरी सरकार त्याची दखल घेईल का?— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 20, 2022
Read also
- ग्रामपंचायत निवडणुक निकाल, दोन गट भिडले, भाजपच्या कार्यकर्त्यांचा मृत्यू
- “2.5 वर्षात भाजपच्या एकही आमदाराला रूपयाचा निधी दिला नाही, पण आता..” फडणवीसांचा हल्लाबोल
- भीक मागणं हा शब्द प्रबोधनकार ठाकरेंचेच..! ठाकरेंशी भेट घेऊन चंद्रकांत पाटलांनी थेट पुस्तकचं दाखवलं
- “पन्नास खोक्क्यांना, माजलेले बोक्के उत्तर”; विधानसभेच्या पायऱ्यावरच सत्ताधारी अन् विरोधक भिडले
- “भिडे वाड्यासाठी निधी द्या”,रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी