नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी ठाकरे उपस्थित नसलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुसऱ्या दिवशी सभागृहात येण्याची शक्यता आहे. त्याआधी काॅंग्रेस कार्यालयात महाविकास आघाडीची बैठक सुरू झाली आहे.
“अमित शहांसोबत आपले मुख्यमंत्री फक्त काॅफी पिऊन आले”; सेनेचा खोचक टोला
पहिल्या दिवशी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. तर बेळगाव, सुरक्षा संदर्भात पहिल्या अधिवेशनाच्या दिवशी चर्चा करण्यात आली.
“संजय राऊतांचा मेंदू बिघडला, त्यांची पक्षातील हकालपट्टी करा, अन्यथा..”
यातच आज उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनात आमनेसामने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिल्या नजरेच्या भेटीत नेमकं काय घडणार त्याचीही उत्सुकता आता सगळ्यांना लागून राहिली आहे. तसेच आज काॅंग्रेसच्या कार्यालयात महाविकास आघाडीची बैठक होत असून शिवसेनेचा बडा नेता पहिल्यांदाच काॅंग्रेसकडे कार्यालयात गेला असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
“सीमावादावर राज्य सरकारची भूमिका नरमाई अन् बोटचेपीची”; अशोक चव्हाणांची टिका
दरम्यान, दुसऱ्या दिवशी सत्ताधारी पक्षाला घेरण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरे मैदानात उतरले असून आज काॅंग्रेसच्या कार्यालयात त्याची रणनीती ठरणार आहे. तसेच हिवाळी अधिवेशन दोन आठवडे चालणार असल्याचं सुचक वक्तव्य मुख्यमंत्री शिंदेंनी केल्याने आगामी काही दिवस राजकीय वातावरण गरम राहण्याची शक्यता आहे.
Read also
- “नागपुरातील थंडीत राजकीय शेकोटीचा मिंधे गटाच्या पाठीला चटका”
- राज्यात 590 ग्रामपंचायती बिनविरोध..! भाजपकडे सर्वाधिक, तर शिंदे गटाकडे 103, राष्ट्रवादी, ठाकरे, काॅंग्रेसकडे किती?
- “राज्याचे मुख्यमंत्री खोक्याच्या माध्यमातून लोकशाही विकत घ्यायला निघाले”
- महापुरूषांचा अपमान थांबवण्यासाठी रोहित पवारांकडून मंत्र्यांना पुस्तकं अन् गुलाबाचं फुल
- शिंदे अन् ठाकरे आमनेसामने येणार…! ठाकरेंचं नागपुरात जोरात स्वागत