नागपूर : मंत्र्यांवर शाईफेक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले, पत्रकारावर गुन्हे दाखल गेले, पोलिसांना निलंबित करण्यात सरकारने तत्परता दाखवली मग महापुरूषांचा अपमान करणारे भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हे का दाखल केले नाहीत… ? असा सवाल काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विविध आंदोलनांनी वेधलं लक्ष्य
महापुरूषांचा अपमान केल्याप्रकरणी चंद्रकांत पाटलांवर शाई फेक करण्यात आली होती. त्यानंतर शाई फेक व्यक्तीला पोलिसांनी अटक करून त्यांच्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले होते. यानंतर राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्य सरकारविरोधात आवाज उठवला होता. त्यावर बोलतांना पु्न्हा नाना पटोले यांनी सवाल केला.
तुम्हाला मंत्रीपद हवं आहे का ? अन् फडणवीसांनी थेट सुनिल प्रभूला दिली ऑफर
विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी मुख्यमंत्री खोक्यांची भीत उभी करणे, कडेलोट करणार असे म्हणातात. राज्याचे मुख्यमंत्री खोक्याच्या माध्यमातून लोकशाही विकत घ्यायला निघाले. असा खोचक टोलाही नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.
“कर्नाटक सरकारची दडपशाही सहन करणार नाही”; बेळगाव प्रवेशबंदीवरून अजित पवार संतापले
दरम्यान, हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस होता. राज्यात मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या वादाचे पडसाद या अधिवेशनात बघायला मिळाले. आज महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद वादावर चर्चा करण्यात आली. तर उद्या महापुरूषांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून विरोधक सत्ताधारी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न करणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Read also
- महापुरूषांचा अपमान थांबवण्यासाठी रोहित पवारांकडून मंत्र्यांना पुस्तकं अन् गुलाबाचं फुल
- शिंदे अन् ठाकरे आमनेसामने येणार…! ठाकरेंचं नागपुरात जोरात स्वागत
- “अमित शहांसोबत आपले मुख्यमंत्री फक्त काॅफी पिऊन आले”; सेनेचा खोचक टोला
- “संजय राऊतांचा मेंदू बिघडला, त्यांची पक्षातील हकालपट्टी करा, अन्यथा..”
- “सीमावादावर राज्य सरकारची भूमिका नरमाई अन् बोटचेपीची”; अशोक चव्हाणांची टिका