नागपूर : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या नंतर हिवाळी अधिवेशनाच्या सुरूवातीला विरोधकांनी शिंदे सरकारला डिवचण्याचा प्रयत्न केला. यातच आता माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे नागपुरात दाखल झाले आहेत. त्यामुळे उद्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
“कर्नाटक सरकारची दडपशाही सहन करणार नाही”; बेळगाव प्रवेशबंदीवरून अजित पवार संतापले
नागपुरात दाखल झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचं जोरदार कार्यकर्त्यांनी स्वागत केलं. यावेळी त्यांच्या गाडीवर कार्यकर्त्यांनी फुलांची उधळण देखील केली. यावेळी हजारो कार्यकर्त्ये उद्धव ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी नागपुर विमानतळावर जमले होते. यातच आज महाविकास आघाडीच्या नेत्यांचीही बैठक होणार असून त्यामध्येही सहभाग घेण्याची शक्यता आहे.
“भाजपच्या दृष्टीने सध्याचे मुख्यमंत्री क्रिकेटमधील नाईट वॉचमन”; काॅंग्रेसची जहरी टिका
आज विधानभवनात महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून विरोधकांनी शिंदे सरकारला धारेवर धरलं. याचसोबत बेळगाव येथे आंदोलन करण्यासाठी निघालेल्या मविआच्या कार्यकर्त्यांना पोलिसांंनी ताब्यात घेतलं. यावरूनही विरोधी पक्षांनी विधानसभेत आवाज उठवला. त्यामुळे आता उद्या विधानभवनात उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार ते पण पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
आई ती आईच असते..! राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे 2.5 वर्षाच्या बाळाला घेऊन विधानभवनात
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे अन् शिंदे एकमेकांनसमोर पहिल्यांदाच येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यावेळी नेमकं काय घडणार याची उत्सुकता देखील सगळ्यांना लागून राहिली आहे. त्यामुळे उद्याचंही राजकीय वातावरण चांगलचं तापण्याची शक्यता आहे.
Read also
- “अमित शहांसोबत आपले मुख्यमंत्री फक्त काॅफी पिऊन आले”; सेनेचा खोचक टोला
- “संजय राऊतांचा मेंदू बिघडला, त्यांची पक्षातील हकालपट्टी करा, अन्यथा..”
- “सीमावादावर राज्य सरकारची भूमिका नरमाई अन् बोटचेपीची”; अशोक चव्हाणांची टिका
- हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विविध आंदोलनांनी वेधलं लक्ष्य
- तुम्हाला मंत्रीपद हवं आहे का ? अन् फडणवीसांनी थेट सुनिल प्रभूला दिली ऑफर