नागपूर : राज्यात महापुरूषांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून विरोधी पक्षांनी रान पेटवलं होतं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याचबरोबर अब्दुल सत्तार, मंगल प्रभात लोढा, चंद्रकांत पाटील, तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यावरून विरोधी पक्षांनी जोरदार आंदोलने केली होती. यातच हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी या सर्व नेत्यांना महापुरूषांची पुस्तक भेट म्हणून दिल्याने एक नवा विषय आता मिळाला आहे.
तुम्हाला मंत्रीपद हवं आहे का ? अन् फडणवीसांनी थेट सुनिल प्रभूला दिली ऑफर
महाराष्ट्राची अस्मिता आणि दैवतं ही आपल्यासाठी सर्वोच्च आहेत. त्यांना कुठंही धक्का लागता कामा नये आणि आपल्या दैवतांचा चुकूनही अवमान होऊ नये याची काळजी सत्ताधारी आणि विरोधक या सर्वांनीच घेतली पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्राच्या या महान व्यक्तिमत्वांचं विचारधन सर्वत्र झिरपलं पाहिजे. असं म्हणत रोहित पवारांनी मंत्र्यांना पुस्तक देतांना ट्विटमध्ये म्हटलं आहे.
“कर्नाटक सरकारची दडपशाही सहन करणार नाही”; बेळगाव प्रवेशबंदीवरून अजित पवार संतापले
राज्यातील नवीन आमदारांनी मिळून इतर सर्व आमदारांना छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुस्तकांचे संच दिले राज्यात सत्ताधाऱ्यांकडून किंबहूना जबाबदार व्यक्तींकडून सातत्याने महापूरूषांचा कळत नकळत होणारा अपमान थांबविण्यासाठी राष्ट्रवादी आमदार रोहित पवारांनी सर्व लोकप्रतिनिधींना महापुरूषांची संपुर्ण माहिती अवगत होण्यासाठी महापुरूषांच्या माहितीच्या सहा पुस्तकांचे वाटप केले.
“भाजपच्या दृष्टीने सध्याचे मुख्यमंत्री क्रिकेटमधील नाईट वॉचमन”; काॅंग्रेसची जहरी टिका
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दिपक केसरकर, राधाकृष्ण विखे पाटील, सदाभाऊ खोत, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शंभुराजे देसाई, संजय शिरसाठ, विधानसभेचे अध्यक्ष, राहुल नार्वेकर, आदित्य ठाकरे यांना रोहित पवारांनी पुस्तकं आणि गुलाबाचं फुल दिलं.
महाराष्ट्राची अस्मिता आणि दैवतं ही आपल्यासाठी सर्वोच्च आहेत. त्यांना कुठंही धक्का लागता कामा नये आणि आपल्या दैवतांचा चुकूनही अवमान होऊ नये याची काळजी सत्ताधारी आणि विरोधक या सर्वांनीच घेतली पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्राच्या या महान व्यक्तिमत्वांचं विचारधन सर्वत्र झिरपलं पाहिजे. pic.twitter.com/hC2YLkbfjW
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 19, 2022
याच हेतूने आम्ही नवीन आमदारांनी मिळून इतर सर्व आमदारांना छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुस्तकांचे संच दिले. pic.twitter.com/pum2udHXQ8
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 19, 2022
Read also
- शिंदे अन् ठाकरे आमनेसामने येणार…! ठाकरेंचं नागपुरात जोरात स्वागत
- “अमित शहांसोबत आपले मुख्यमंत्री फक्त काॅफी पिऊन आले”; सेनेचा खोचक टोला
- “संजय राऊतांचा मेंदू बिघडला, त्यांची पक्षातील हकालपट्टी करा, अन्यथा..”
- “सीमावादावर राज्य सरकारची भूमिका नरमाई अन् बोटचेपीची”; अशोक चव्हाणांची टिका
- हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विविध आंदोलनांनी वेधलं लक्ष्य