मुंबई : भाजपचं प्रदेशाध्यक्ष पद असेपर्यंत राज्याच्या मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांना केल्याशिवाय राहणार नाही. असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं. त्यावरून त्यांच्यावर महाविकास आघाडीकडून कडाडून टिका करण्यात आली. यातच आता सामनाच्या अग्रलेखातून चंद्रशेखर बावनकुळेंचा समाचार घेतला आहे.
“संजय राऊतांचा मेंदू बिघडला, त्यांची पक्षातील हकालपट्टी करा, अन्यथा..”
नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडावर बावनकुळे यांनी सांगितले की, आमचे पुढील मुख्यमंत्री तुम्हीच, याचा अर्थ स्पष्ट की, मिंधे सरकारच्या पायाखालची सतरंजी ओढली जात आहे व फडणवीस वगैरे लोक सरकार व शिंद्यांच्या बाजून लढत असल्याचा नुसता आव आणीत आहेत. बावनकुळे हे शंभर टक्के फडणवीसनिष्ठ आहेत व फडणवीस यांना हवी तीच भूमिका ते घेतात. असा टोलाही सामनामधून लगावण्यात आला आहे.
“सीमावादावर राज्य सरकारची भूमिका नरमाई अन् बोटचेपीची”; अशोक चव्हाणांची टिका
मग इतके मोठे विधान फडणवीस यांच्या मंजुरीशिवाय ते करतील काय? हाच प्रश्न आहे. नागपुरातील थंडीत राजकीय शेकोटीचा मिंधे गटाच्या पाठीला चटका बसला आहे. फेब्रुवारीपर्यंत बरेच काही घडेल. महाराष्ट्रातील औटघटकेची व्यवस्था डामडौल आहे. बावनकुळे यांनी तसा फटाकाच फोडला आहे. भाजपच्या मनावरील दगड दुर करण्याचे काम सुरू झाले आहे. असंही सामानामधून म्हटलं आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विविध आंदोलनांनी वेधलं लक्ष्य
दरम्यान, आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस असून सत्ताधारी पक्षांवर विरोधक कशापद्धतीने घेरण्याचा प्रयत्न करणार त्याकडे सगळ्याचं लक्ष्य लागून राहिलं आहे. तर दुसरीकडे राज्यातील 7 हजार 751 ग्रामंपचायतीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे कोण जास्त ग्रामपंचायतीचा आपल्या ताब्यात ठेवणार ते पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.
Read also
- राज्यात 590 ग्रामपंचायती बिनविरोध..! भाजपकडे सर्वाधिक, तर शिंदे गटाकडे 103, राष्ट्रवादी, ठाकरे, काॅंग्रेसकडे किती?
- “राज्याचे मुख्यमंत्री खोक्याच्या माध्यमातून लोकशाही विकत घ्यायला निघाले”
- महापुरूषांचा अपमान थांबवण्यासाठी रोहित पवारांकडून मंत्र्यांना पुस्तकं अन् गुलाबाचं फुल
- शिंदे अन् ठाकरे आमनेसामने येणार…! ठाकरेंचं नागपुरात जोरात स्वागत
- “अमित शहांसोबत आपले मुख्यमंत्री फक्त काॅफी पिऊन आले”; सेनेचा खोचक टोला