नागपूर : राज्याचं हिवाळी अधिवेशन आज वेगळ्याच प्रसंगामुळे चर्चेत आलं आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंना चंद्रकांत पाटलांनी प्रबोधन ठाकरे यांचं पुस्तक भेट देऊन त्यातील काही मजकुरही वाचून दाखवला. त्यामुळे हा विषय सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे नागपुरमध्ये दाखल झाले आहेत. त्याआधी राज्यभरात गाजत असलेल्या महापुरूषांच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकातील भीक मागणं हा आशाय वाचून दाखवत त्यांनी उद्धव ठाकरेंशी काही काळ संवाद साधला.
“राज्याचे मुख्यमंत्री खोक्याच्या माध्यमातून लोकशाही विकत घ्यायला निघाले”
चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीचे फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याआधी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य राज्यातील मंत्र्यांकडून करण्यात आली होती. त्यावर उद्धव ठाकरे यांनी फुले दाम्पत्य नसते तर आपण मंत्री झालो नसतो. एका मंत्र्याने भीक शब्द वापरून बौद्धिक दारिद्रय दाखवून दिल्याची टिका ठाकरेंनी केली होती.
महापुरूषांचा अपमान थांबवण्यासाठी रोहित पवारांकडून मंत्र्यांना पुस्तकं अन् गुलाबाचं फुल
दरम्यान, एका जाहीर कार्यक्रमात चंद्रकांत पाटलांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. महापुरूषांनी भीक मागून शाळा चालवल्या असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. त्यानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता.
Read also
- “पन्नास खोक्क्यांना, माजलेले बोक्के उत्तर”; विधानसभेच्या पायऱ्यावरच सत्ताधारी अन् विरोधक भिडले
- “भिडे वाड्यासाठी निधी द्या”,रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- “महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपचं नंबर 1 चा पक्ष राहणार”; फडणवीसांचा विश्वास
- सेनेचा बडा नेता पहिल्यांदाच काॅंग्रेसच्या कार्यालयात, मविआची बैठक, ठाकरे उपस्थित
- “नागपुरातील थंडीत राजकीय शेकोटीचा मिंधे गटाच्या पाठीला चटका”