नागपूर : आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचीही सुरूवात जोरदार झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी पायऱ्यावर येत एकमेकांवर जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, या आशायाच्या टोप्या घालून विरोधकांनी पायऱ्यांवर सत्ताधारी पक्षांविरोधात घोषणाबाजी देण्यात येत आहे.
“राज्याचे मुख्यमंत्री खोक्याच्या माध्यमातून लोकशाही विकत घ्यायला निघाले”
पन्नास खोके एकदम ओक्के, महाराष्ट्राची पिवळणुक, गुजरातला गुंतवणुक, अशी पोस्टरं विरोधकांनी दाखविली तर ५० आमदार एकदम ओक्के घरी बसवले माजलेले बोके अशा आशायचं पोस्टर सत्ताधारी पक्षांकडून दाखवण्यात आलं आहेत. जे पन्नास खोक्क्यांचा आमच्यावर आरोप करीत आहेत. त्या पन्नास माजलेल्या बोक्क्यांना घरी बसवलं आहेत. अशी प्रतिक्रिया शिंदे गटातील आमदारांनी दिली आहे.
महापुरूषांचा अपमान थांबवण्यासाठी रोहित पवारांकडून मंत्र्यांना पुस्तकं अन् गुलाबाचं फुल
महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून साधू संताचा वारंवार अपमान केला जात आहे. तसेच हिंदु धर्माचा सातत्याने अपमान केला जात आहे. त्यालाच उत्तर म्हणून 50 आमदार एकदम ओक्के घरी बसवले माजलेले बोके असं दाखवत संजय गायकवाड यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.
Read also
- “भिडे वाड्यासाठी निधी द्या”,रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- “महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपचं नंबर 1 चा पक्ष राहणार”; फडणवीसांचा विश्वास
- सेनेचा बडा नेता पहिल्यांदाच काॅंग्रेसच्या कार्यालयात, मविआची बैठक, ठाकरे उपस्थित
- “नागपुरातील थंडीत राजकीय शेकोटीचा मिंधे गटाच्या पाठीला चटका”
- राज्यात 590 ग्रामपंचायती बिनविरोध..! भाजपकडे सर्वाधिक, तर शिंदे गटाकडे 103, राष्ट्रवादी, ठाकरे, काॅंग्रेसकडे किती?