मुंबई : महाविकास आघाडी सरकार असतांना तत्कालीन नगर विकास मंत्री तसेच विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग केला आहे. 83 कोटीचा भुखंड दोन कोटी रूपयांना दिल्याचा आरोप विधान परिषदेत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. त्याचे पडसाद विधान सभेच्या देखील पडतांना दिसले. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाली.
“खुद्द उर्जामंत्री बोलत असताना सभागृहात बत्ती गुल..! बल्ब, माईक सभागृह शांत
83 कोटीचा भुखंड दोन कोटीचा मुद्दा, राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी चर्चेत आणला. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देण्यासाठी उभे राहिलेत. परंतु त्यावर मुख्यमंत्री सभागृहात असतांना यावर उपमुख्यमंत्री उत्तर देताहेत हे हास्यास्पद आहे. असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. त्यावेळी मोठा गोंधळ बघायला मिळाला.
ग्रामपंचायत निवडणुक निकाल, दोन गट भिडले, भाजपच्या कार्यकर्त्यांचा मृत्यू
त्यावर महाविकास आघाडीतील नेते मुख्यमंत्र्यांवर बिनबुडाचे आरोप करीत आहे. तसेच यावर उत्तर देण्यास मी सक्षम आहे. आम्ही भुखंडावर श्रीखंड खाणारे नाहीत. असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी टोला हाणला. त्यावेळी विरोधकांनी जोरदार घोषणा बाजी देत सभागृहात गोंधळ माजवला. यावेळी विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मध्यस्थी करून वाद मिटवावा लागला.
“2.5 वर्षात भाजपच्या एकही आमदाराला रूपयाचा निधी दिला नाही, पण आता..” फडणवीसांचा हल्लाबोल
दरम्यान, या प्रकरणाता न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. झोपडट्टीसाठी राखीव भूखंड असताना असा हस्तक्षेप केल्यामुले विद्यामान मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. अशी मागणी एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
Read also
- “आमचा मोर्चा नॅनो नाही तर फडणवीस साईज…!” ठाकरेंचं फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर
- “भाजप व शिंदे गटाची गावात इज्जत राहिली नाही, फडणीसांच्या त्या गावातही भाजपचा पराभव”
- “महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी बृजभुषण सिंह मुंबईत येणार, पाठपुरावा करतेय,”
- गोपीचंद पडळकरांच्या मोताश्री विजयी, गोपीचंद पडळकरांचा थेट फोन
- भुखंडचा वाद सभागृहात पेटला..! फडणवीस, पाटील, भुजबळ एकमेकांत लढले, अध्यक्षांची तारांबळ