बीड : राज्यात काल 7 हजार 751 ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी राज्यात विविध ठिकाणी विजयी उमेदवारांनी मोठ्या आंनदात साजरा करत जोरदार गुलाल उधळला. यातच बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील निमगाव चोभा ग्रामपंचायतीचा निकाल जाहिर झाला असून सरपंचपदी भाग्यश्री वैजनाथ गाडे यांची निवड झाली आहे. त्या 476 मताधिक्याने विजयी झाल्या आहेत.
पिंपरी-चिंचवडच्या शास्तीकराचा प्रश्न विधानसभेच्या पटलावर..! आमदार महेश लांडगे यांनी लक्ष वेधले
निमगाव चोभा ग्रामपंचायतील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे, माजी पंचायत समिती सदस्य सुनील गाडे आणि विजय भाऊसाहेब शेळके पुरस्कृत कानिफनाथ ग्रामविकास पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. सरपंच पदासाठी भाग्यश्री वैजनाथ गाडे विरुध्द जया सतिष झगडे अशी दुहेरी लढत झाली. वार्ड क्रमांक दोनमधून कानिफनाथ ग्रामविकास पॅनलचे विजय भाऊसाहेब शेळके सर्वाधिक 412 मताधिक्याने विजयी झाले.
मुख्यमंत्री जोरात…! पहिल्या दिवशी मागणी, लगचेच दुसऱ्या दिवशी हिरकणी कक्ष
डॉ. सुनिल गाडे यांनी विजयी सभेत बोलताना म्हणाले की, गावात शिक्षण, आरोग्य या विषयांकडे अधिक लक्ष देण्यात येईल. तसेच गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मोफत करण्यात येईल. प्रचारावेळी दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करू. असंही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर वार्ड क्रमांक दोनमध्ये काशीबाई रवींद्र थेटे, संजय रावसाहेब गाडे विजयी झाले आहेत. वार्ड क्रमांक एकमध्ये संगिता सुरेश पवार, रंजना पोपट गाडे विजयी झाले आहेत.
“भुखंडावर श्रीखंड खाणारे आम्ही नाहीत”, सभागृहात फडणवीसांचं विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर
तसेच निमगाव चोभा विकास आघाडीचे सुनिल जगन्नाथ गिऱ्हे विजयी झाले आहेत. वार्ड क्रमांक तीनमध्ये शीतल प्रशांत धस, अलका संजय रेपाटे आणि आजिनाथ विश्वनाथ काशिद निवडूण आले आहेत. कोरोना काळात जनतेचा केलेली सेवा, श्रावणबाळ योजना आणि घरकुल योजना लोकापर्यंत पोहोचवली. विजय शेळके यांनी जनतेची कामे केल्याने जनतेने मतदानरूपी विश्वास दाखवला आहे.
Read also
- “पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे नवे राष्ट्रपती”, अमृता फडणवीसांचं वक्तव्य
- ऐतिहासिक निर्णय : पिंपरी-चिंचवडकरांची शास्तीकरातून अखेर मुक्ती…! भाजपा आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा
- “मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारचा खोटारडेपणा उघड केला”; सीमावादावर राष्ट्रवादीची टिका
- “संजय राऊत पिसाळलेला कुत्रा, त्याला ठेचल्याशिवाय राहणार नाही”; संतोष बांगरांनी दिली धमकी
- TET घोटाळा..! मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांच्या मुलांचा समावेश, विरोधकांनी मुद्दा ताणला