मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मुंबईचा उल्लेख सोन्याचं अंड देणारी कोंबडी असा केला. त्यावर भाजपच्या नेत्या मनिषा चौधरी यांनी आक्षेप घेत भुजबळांनी तो शब्द मागे घ्यावा, नाहीतर त्यांना आम्ही बोलू देणार नाही. अशी भूमिका घेतली. त्यानंतर सभागृहात गोंधळ झाल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मध्यस्थी केली. तरीही दुसऱ्या बाजूने गोंधळ सुरू होता. त्यावर अजित पवारांनी बंडखोर आमदारांना सुनावलं.
“संजय राऊत पिसाळलेला कुत्रा, त्याला ठेचल्याशिवाय राहणार नाही”; संतोष बांगरांनी दिली धमकी
अजित पवारांनी सभागृहात उभं राहून छगन भुजबळांनी आपला शब्द मागे घेतल्याचं सांगितलं. परंतु दुसऱ्या बाजूने आवाज येत असतांना अजित पवार म्हणाले की, अरे संजय बेटा, थांब जरा, माझं ऐक , खाली बस्स. असं म्हणत त्यांनी भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना शांत केलं.
TET घोटाळा..! मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांच्या मुलांचा समावेश, विरोधकांनी मुद्दा ताणला
यानंतरही छगन भुजबळ बोलण्यासाठी उभे राहिलेत. परंतु तरीही सत्ताधारी आमदारांनी यावरून गदारोळ सुरूच ठेवला. त्यानंतर मग तालिका अध्यक्षांनी सभागृह दहा मिनिटे तहकुब करण्याचा निर्णय घेतला.
Read also
- फोटो मॉर्फचा मुद्दा विधानसभेत..! जयंत पाटलांनी फोटोच दाखवून भाजपला पकडलं कोंडीत” भुजबळही हसले
- निमगाव चोभा ग्रामपंचायतीत कानिफनाथ ग्रामविकास पॅनलचा दणदणीत विजय
- “पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे नवे राष्ट्रपती”, अमृता फडणवीसांचं वक्तव्य
- ऐतिहासिक निर्णय : पिंपरी-चिंचवडकरांची शास्तीकरातून अखेर मुक्ती…! भाजपा आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा
- “मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारचा खोटारडेपणा उघड केला”; सीमावादावर राष्ट्रवादीची टिका