नागपूर : जिंतूर येथील तहसील कार्यालयातील महिला आणि कर्मचाऱ्यांचे छायाचित्रे मॉर्फ करून सोशल मीडियावर फिरवले जात आहे. असे अनेक प्रकार सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. तर त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी आज विधानसभेत केली. त्यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर योग्य ती कारवाई करू असं आश्वासन दिलं. परंतु याच वेळी राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी यावरून भाजपवर टिका केली आहे.
TET घोटाळा..! मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांच्या मुलांचा समावेश, विरोधकांनी मुद्दा ताणला
देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय मांडल्यानंतर जंयत पाटील बोलण्यासाठी उभे राहिले. भाजपच्या नेते अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा सांता क्लाॅज मध्ये विधानसभेत येतानाचा फोटो मॉर्फ केला आहे. त्यावरून जयंत पाटलांनी यावर कारवाई करण्याची मागणी केली.
पिंपरी-चिंचवडच्या शास्तीकराचा प्रश्न विधानसभेच्या पटलावर..! आमदार महेश लांडगे यांनी लक्ष वेधले
छगन भुजबळ यांनी अलिकडेच सरस्वती देवीसंदर्भात एक भाष्य केलं होतं. त्यावरून अतुल भातखळकर यांनी सांता क्लॉज मध्ये छगन भुजबळ यांचा फोटो ट्विट केला. अन् त्यावर सरस्वती देवीला न मानणारा एकदम ओरिजनल सांता क्लॉज असं कॅप्शन दिलं. तोच फोटो जयंत पाटील यांनी सभागृहात दाखवत अतुल भातखळकरवर कारवाई करण्याची मागणी केली.
मुख्यमंत्री जोरात…! पहिल्या दिवशी मागणी, लगचेच दुसऱ्या दिवशी हिरकणी कक्ष
दरम्यान, आज विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस असून हाही दिवस विरोधकांनी गाजवला. आज अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच भुखंडवरूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली. परंतु त्यावर विधानसभा अध्यक्षांनी मध्यस्थी केली.
फोटो मॉर्फचा मुद्दा विधानसभेत..! जयंत पाटलांनी फोटोच दाखवून भाजपला पकडलं कोंडीत” भुजबळही हसलेफोटो मॉर्फचा मुद्दा विधानसभेत..! जयंत पाटलांनी फोटोच दाखवून भाजपला पकडलं कोंडीत” भुजबळही हसले
सरस्वती देवीला न मानणारा एकदम ओरिजनल सांता क्लॉज… pic.twitter.com/pUMSkKVfa5
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 21, 2022
Read also
- निमगाव चोभा ग्रामपंचायतीत कानिफनाथ ग्रामविकास पॅनलचा दणदणीत विजय
- “पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे नवे राष्ट्रपती”, अमृता फडणवीसांचं वक्तव्य
- ऐतिहासिक निर्णय : पिंपरी-चिंचवडकरांची शास्तीकरातून अखेर मुक्ती…! भाजपा आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा
- “मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारचा खोटारडेपणा उघड केला”; सीमावादावर राष्ट्रवादीची टिका
- “संजय राऊत पिसाळलेला कुत्रा, त्याला ठेचल्याशिवाय राहणार नाही”; संतोष बांगरांनी दिली धमकी