पुणे : राज्यात सरकारमध्ये मित्रपक्ष असलेले जिल्ह्यात स्थानिक पातळीवर एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. यामुळे मात्र स्थानिक पातळीवर आमदार, खासदार अन्य पदाधिकारी यांची चांगलीच अडचण झाली आहे. यात काही पंचायत समितीच्या सभापती निवढणुकीत तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेते व कार्यकर्ते यांच्यातील वाद न्यायालयापर्यंत पोहोचले. या वादामुळे राज्यातील महाआघाडी सरकारमध्ये ठिणगी पडते की काय, असे वातावरण निर्माण झाल्याने शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांना प्रत्यक्ष खेड तालुक्यात येवून वातावरण शांत करण्याची वेळ आली आहे.
बदल्यांसंदर्भात मंत्रालयात थेट सिल्वर ओक वरून कॉल? हॅलो, मी शरद पवार बोलतोय!
पुणे जिल्ह्यातील परिषदेसह बहुतेक सर्व पंचायत समित्या आणि अनेक ग्रामपंचायत निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये मित्र असलेले राष्ट्रवादी आणि शिवसेना एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. यात राष्ट्रवादी काही तालुक्यात शिवसेना आणि काँग्रेसचे वर्चस्व आहे. यामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड, पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादीच्या विरोधात शिवसेना आमनेसामने आहेत. तर भोर, वेल्हा आणि मुळशी तालुक्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. तर शिरूर, मावळमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात लढत आहे. बारामती, इंदापूर, दौंड तालुक्यात देखील राष्ट्रवादीला भाजपचे आव्हान आहे. यामुळे दोन वर्षभर राज्यात सत्तेत एकत्र असलेले मित्रपक्ष आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काय करणार याचे राजकीय चर्चा सध्या सुरू आहे.
पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व
जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांपैकी सहा पंचायत समित्या राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. तीन पंचायत समित्यांमध्ये शिवसेनेचे सभापती, एका पंचायत समितीत काँग्रेसची सत्ता आहे. एकूणच ग्रामीण भागातील बहुतेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीचेच वर्चस्व आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी एकमेकांना पाठिंबा दिला आहे.
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
जिल्हा परिषदेत ७५ सदस्यांपैकी एकट्या राष्ट्रवादीकडे ४२ सदस्य असून जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. तर विरोधी पक्ष म्हणून शिवसेना जबाबदारी निभावत आहे. शिवसेनेचे १४ सदस्य तर काँग्रेस आणि भाजपचे प्रत्येकी सात सदस्य आहेत व इथर पाच सदस्य आहेत.
Read Also :
- माजी मंत्री संजय राठोड यांनी महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी; पीडीत महिलेची पोलिसांत तक्रार
- मनसेची मोर्चेबांधणी : राज ठाकरे चौथ्यांदा पुणे दौऱ्यावर, २०२२ साठी खास रणनीती!
- मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा; पत्नीनं केली तक्रार
- माझा पराभव त्यांच्यामुळेच…चंद्रकांत खैरेंचा धक्कादायक गौप्यस्फोट; केले भाजप केंद्रीय मंत्र्यावर गंभीर आरोप
- बाळासाहेब थोरातांसह काँग्रेसच्या ५ बड्या नेत्यांवर ट्विटरची कारवाई, आम्ही लढत राहू! काँग्रेसचा निर्धार