पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा पुण्याचा दौरा करणार आहेत. उद्यापासून राज ठाकरे दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. दोन दिवसीय दौऱ्यात राज ठाकरे पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. शिवाय बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे गेल्या महिनाभरातील राज ठाकरे यांचा हा चौथा पुणे दौरा आहे. राज ठाकरे हे ६ ऑगस्टलाही पुणे दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर आज त्यांनी पुन्हा पुणे दौऱ्याचं नियोजन केलं आहे.
“भिक मागा, भिक मागा भाजपवाले भिक मागा, वकिलांच्या फीसाठी भिक मागा,” पुण्यात शिवसेनेचे आंदोलन
ठाण्याचा दौरा झाल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे २७ जुलैला पुण्यात दाखल झाले होते. राज ठाकरे २ ऑगस्टपर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवड दौऱ्यावर होते. त्याआधीच्या आठवड्यात राज ठाकरे यांनी पुणे दौरा केला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे १९,२० आणि २१ जुलै अशा तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरेंचा पुढचा पुणे दौराही ठरला होता. आठ दिवसांनी म्हणजे ३० जुलैला राज ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी दिली होती. त्यानंतर आता राज ठाकरे आज पुन्हा पुणे दौऱ्यावर गेले आहेत.
“आम्हाला वाटले आम्ही हिंदुस्तान-पाकिस्तानच्या सीमेवर आहोत, ही कसली लोकशाही?”
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आल्याचं चित्र आहे. आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. नाशिकनंतर पुण्यात आलेल्या राज ठाकरे यांचा ‘राजसंवाद’ हा दौरा केला होता.
दरम्यान, पुणे महापालिकेत मनसेची चांगली कामगिरी व्हावी म्हणून राज ठाकरे यांनी पक्षाच्या शाखाध्यक्षांसाठी भन्नाट ऑफरही दिली. चांगलं काम करणाऱ्या शाखाध्यक्षांच्या घरी मी जेवायला येईन, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. कार्यकर्त्यांमध्ये उभारी भरण्यासाठी राज यांनी ही ऑफर दिली आहे. सध्या पुण्यता मनसे कार्यकर्त्यांमध्ये या ऑफरची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, प्रभार रचनेमुळे पक्षाचे नगरसेवक कमी झाले असं मनसे नेते सांगतात. मात्र, शहरातील पक्ष संघटनेचा प्रभावही कमी झाला होता. आगामी २०२२ च्या महापालिका निवडणुकीत मनसे सर्व जागा लढवणार आहे. त्यातील ९० जागांवर मनसेनं लक्ष केंद्रीत केल्याचं सांगतानाच ४५ जागा निवडून येणारच असा दावा मनसेचे नेते करत आहेत.
Read Also :
- बदल्यांसंदर्भात मंत्रालयात थेट सिल्वर ओक वरून कॉल? हॅलो, मी शरद पवार बोलतोय!
- मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा; पत्नीनं केली तक्रार
- माझा पराभव त्यांच्यामुळेच…चंद्रकांत खैरेंचा धक्कादायक गौप्यस्फोट; केले भाजप केंद्रीय मंत्र्यावर गंभीर आरोप
- बाळासाहेब थोरातांसह काँग्रेसच्या ५ बड्या नेत्यांवर ट्विटरची कारवाई, आम्ही लढत राहू! काँग्रेसचा निर्धार
- भाजप नेत्याच्या अकलेचे तारे; मोदींची तुलना केली थेट छत्रपती शिवाजीमहाराज आणि राजा शालिवाहन यांच्याशी