यवतमाळ : माजी मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात एका महिलेने गंभीर तक्रार केली असून त्याची चौकशी आता यवतमाळ पोलिस करत आहे. पतीला पुन्हा नोकरीत घेण्यासाठी त्यांनी शरीरसुखाची मागणी केली होती, असे या पत्रात म्हटले आहे. यवतमाळ पोलिसांना पत्राद्वारे ही तक्रार मिळाली आहे. त्याचा तपास करत असल्याचे यवतमाळचे पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ यांनी सांगितले आहे.
“…एवढा थापाड्या मंत्री इतिहासात झाला नसेल,” पडळकरांचा वडेट्टीवारांवर जोरदार निशाणा
भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी या संदर्भात ट्विट केले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील माजी मंत्री आ संजय राठोड यांनी एका महिलेला पतीला नोकरीवर पूर्ववत घेण्यासाठी शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार संबंधित महिलेने घाटंजी पोलिसांना स्पीड पोस्टाने पाठवल्याचे वाघ यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
बदल्यांसंदर्भात मंत्रालयात थेट सिल्वर ओक वरून कॉल? हॅलो, मी शरद पवार बोलतोय!
पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांनी असे पत्र घाटंजी पोलिसांना प्राप्त झाल्याचे सांगितले. त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करू असे पोलीस अधीक्षक यांनी फोनवर माहिती दिली. त्यांनी कोणाच्या विरोधात तक्रार आहे, त्याचा उल्लेख केला नाही.
शिवसेना आमदार माजीमंत्री संजय राठोडवर शरीरसुखाची मागणी केल्याची लिखीत सविस्तर तक्रार एका भगिनीने यवतमाळ पोलिसांना पोस्टाने पाठवलीये
त्यावेळी मंत्री असल्यामुळे तक्रारीची दखल घेतली गेली नाही तसेच आजही संजय राठोड माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करतं लैंगिक छळ करतो असं ही त्यात म्हंटलंय pic.twitter.com/4ZFQU6NGHt— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 12, 2021
राठाेड हे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात वनमंत्री होते. पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. पूजा चव्हाणच्या फोनमधील संभाषण पोलिसांना तपासल्यानंतर त्यातील संभाषण हे राठोड यांचे असल्याचा दावा करणारे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या प्रकरणाने राजकीय पिछेहाट झाल्यानंतर आता नवीन प्रकरण राठोड यांच्यासमोर उभे राहिले आहे.
Read Also :
- मनसेची मोर्चेबांधणी : राज ठाकरे चौथ्यांदा पुणे दौऱ्यावर, २०२२ साठी खास रणनीती!
- मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा; पत्नीनं केली तक्रार
- माझा पराभव त्यांच्यामुळेच…चंद्रकांत खैरेंचा धक्कादायक गौप्यस्फोट; केले भाजप केंद्रीय मंत्र्यावर गंभीर आरोप
- बाळासाहेब थोरातांसह काँग्रेसच्या ५ बड्या नेत्यांवर ट्विटरची कारवाई, आम्ही लढत राहू! काँग्रेसचा निर्धार
- भाजप नेत्याच्या अकलेचे तारे; मोदींची तुलना केली थेट छत्रपती शिवाजीमहाराज आणि राजा शालिवाहन यांच्याशी