मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजारी असल्यामुळे राज्य सरकारचा कारभार अजून पूर्ण क्षमतेने पाहत नाहीत. त्यात दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या प्रश्नावर परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासोबत बैठका घेत असल्याचे चित्र दिसून आले. त्यात पवार आणि परब या दोघांनीही एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत काही आश्वासने देत संप मागे घेण्याचे आवाहन केले. त्यावरून विरोधकांनी जोरदार टीका केली.
खेड प्रस्तावित विमानतळ : आमदार महेश लांडगेंच्या आवाहनाला शिरुरच्या आजी-माजी खासदारांची उत्तर !
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चार्ज शरद पवार यांच्याकडे दिला आहे का, असा प्रश्न भाजप आमदार राम कदम यांनी उपस्थित केला. याबद्दल शरद पवार यांना मंगळवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत विचारणा करण्यात आली. तेव्हा शरद पवार यांनी उपरोधिकपणे हसत म्हटले की, हे विधान करणाऱ्या नेत्याच्या ज्ञानाचं, बुद्धीचं मी कौतुक करतो. प्रश्न असा आहे की, एखाद्या कामगार संघटनेने बोलावलं तर मला चर्चा करण्याचा अधिकार आहे. त्या अधिकाराने चर्चा करण्यात काहीही चुकीचं नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे निर्णय घेतात. त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना समोर येण्यास मर्यादा होत्या.
पवार साहेबांची अॅलर्जी कोणाला; भुजबळांचा पडळकरांना खडा सवाल
पण कालच्या बैठकीत झालेली चर्चा परिवहनमंत्र्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवली असणार. राज्याच्यादृष्टीने महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ एकत्र विचार करुनच घेते, असेही शरद पवार यांनी सांगितले.
पुण्यात भाजपला धक्का, 18 नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला?
राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत सोमवारी एसटी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर २२ एसटी संघटनांच्या पदाधिकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. मात्र, आता याच बैठकीवरुन भाजप नेते शिवसेना आणि राष्ट्रवादीला लक्ष्य करताना दिसत आहेत.
Read also:
- आगामी पाचपैकी ३ राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढवणार; शरद पवारांची घोषणा
- युपी निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा झटका; योगी सरकारमधील बड्या मंत्र्याचा राजीनामा
- मुंबई महानगरपालिका म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी कमाईचे साधन – किरीट सोमय्या
- …कारभार बीडच्या नावाला काळिमा फासणारे आहेत – पंकजा मुंडे
- “पवारांना बैठका घ्यायचाच असतील, तर मुख्यमंत्री त्यांनाच चार्ज का देत नाहीत?”