मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेच्या निवडणुकीत देखील अपक्ष आमदारांची भूमिका महत्वाची राहणार आहे. त्यामध्ये बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकुर गेमचेंजर ठरणार आहेत. त्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीतील नेते हितेंद्र ठाकुर यांची भेट घेताना दिसत आहेत. यामध्ये भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेेते प्रवीण दरेकर यांनी देखील त्यांची भेट घेतली आहे.
“घोडा बाजार जवळच आहे, त्याचा निकाल लवकरच लागणार”; बच्चू कडू
भाजपचे नेते गिरीश महाजन आणि प्रवीण दरेकर मुंबईच्या लोकलने प्रवास करत हितेंद्र ठाकुर यांच्या भेटीला गेले. हितेंद्र ठाकुर यांच्या घरी पोहचल्यानंतर त्यांच्यात मस्त चर्चा झाली. अप्पा तुम्ही मला शिव्या दिल्यात. त्यामुळे मी भेटण्यासाठी आलो आहे. असं म्हणत प्रवीण दरेकर यांनी हितेंद्र ठाकुर यांना टोला लगावला. त्यावर बोलताना मी त्या प्रसादला शिव्या घातल्या, असं म्हणत हितेंद्र ठाकुर यांनी प्रवीण दरेकरांना प्रत्युत्तर दिलं.
“शरद पवार राष्ट्रपती पदासाठी उभे राहिले असते तर पारडे त्यांच्याकडे झुकले असते”
प्रवीण दरेकर आणि गिरीश महाजन गाडीतून उतरल्यानंतर प्रवीण दरेकर म्हणाले की, अप्पा मी ऐकलं, तुम्ही मला शिव्या दिल्या, म्हणून मला यावं लागलं. प्रसाद बोलला आप्पा मोठा झाला का? असा सवाल प्रवीण दरेकरांनी केला. त्यावर गिरीश महाजनसहीत उपस्थित सर्व जण हसू लागले. त्यावर हितेंद्र ठाकुर म्हणाले की, असं मी बोललो. मी त्या प्रसाद ला शिव्या घातल्या असतील. त्यानंतर त्यांच्यात जोरदार चर्चा रंगली.
“शरद पवारांचं फक्त नाव वाजवण्यासाठी चर्चा”; गुणरत्ने सदावर्तेंनी साधला पवारांवर निशाणा
दरम्यान, हितेंद्र ठाकुर यांच्याकडे सध्या तीन आमदार असून त्यांची भेट घेण्यासाठी काॅंग्रेसकडून भाई जगताप, आणि राष्ट्रवादीकडून रामराजे निबांळकर देखील आले होते. राज्यसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकुर यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. यावेळी ते कोणत्या उमेदवारांना मत देणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- सेनेलाच मत देणार, शिवसेना आमदारांची भूमिका; तर मुख्यमंत्र्यावर काॅंग्रेसकडून दवाब
- “निवडणुकीमध्ये भाजप मतांसाठी दबाव, अन् दहशत निर्माण करतील”; संजय राऊत
- “आघाडीतील काही आमदारांशी भाजपकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न”; थोरातांचा खळबळजनक दावा
- आपणास ‘बारा’ हत्तीचं बळ मिळो, रोहित पवारांच्या भगतसिंग कोश्यारींना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा
- “महंमद तुघलकी सारखी अग्निपथ योजना केंद्र सरकारने मागे घ्यावी”; सचिन खरात