मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रपती पदासाठी नकार दिल्याने काॅंग्रेस देखील उमेदवार देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राष्ट्रपती पदाची निवडणुक ही बिनविरोध होते की काय असं चित्र सध्या निर्माण झालं आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेला रोहित पवारांचा विरोध; अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीच्या घटना
राष्ट्रपती पदासाठी शरद पवारांनी तर होकार दिला असता तर ही निवडणुक अजूनही रंगतदार झाली असती. कदाचित शरद पवारांच्या बाजून पारडे झुकले असते. आजही भाजपाकडे राष्ट्रपती निवडणुकीसाठी जे बहुमत लागते ते नाही आहे. शरद पवार या निवडणुकीसाठी उभे राहिले असते तर अनेक राज्यातून मतदान झालं असतं. भाजपची मदार खासदरांच्या मतांवर आहे आणि त्यांचे मुल्य सर्वाधिक असते. भाजप फार तर १०० मतांनी पुढे असेल त्यामुळे सामाना बरोबरीचा आहे. असंही ते म्हणाले.
“आता भाजपला कोणत्याही निवडणुकीत जिंकणं अशक्य”; नाना पटोलेंचा भाजपवर पुन्हा हल्लाबोल
अनेक वेळा राष्ट्रपती हे सत्ताधारी पक्षातले नेमले जातात. गेल्या काही काळात स्वंतत्र्यपणे काम करणारे राष्ट्रपती कमी मिळाले आहेत. आता सत्ताधारी पक्ष त्यांच्या विचारांचे, त्यांच्या हो ला हो म्हणणारे नवीन राष्ट्रपती घेऊन येतील सत्ताधारी पक्षाकडून सुद्धा या देशातील विरोधी पक्ष नेत्यांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही एक प्रक्रिया असते. सगळ्या देशाला मान्य होईल अशा प्रकारची व्यक्ती तिथे बसायला हवी. पण सत्ताधारी पक्षातील एक नेता तिथे पाठवला जातो आणि तो कार्यकर्ता म्हणून बसतो असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.
अन् चक्क रोहित पवारांनी गौतम अदानीच्या गाडीचं सारथ्य केलं; राजकीय वर्तुळात एकच चर्चा
दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीनंतर लगेचच राष्ट्रपती पदासाठी निवडणुक होत आहे. त्यासाठी १८ जुलै ला मतदान होत आहे. नवनियुक्त राष्ट्रपती २५ जूलै रोजी शपथ घेतील. त्यामुळे भाजप कोणता उमेदवार देणार आहे. त्याकडे लक्ष लागून राहिलं आहे.
Read also:
- “शरद पवारांचं फक्त नाव वाजवण्यासाठी चर्चा”; गुणरत्ने सदावर्तेंनी साधला पवारांवर निशाणा
- “पुण्यातील शहराध्यक्ष पदाच्या बातम्या एप्रिल फुल सारख्या”; चंद्रकांत पाटलांनी दिला चर्चेला पुर्णविराम
- विखे पाटलांनी दिलेल्या ऑफरवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले, “आमचं मस्त चाललंय”
- “शरद पवारांचं फक्त नाव वाजवण्यासाठी चर्चा”; गुणरत्ने सदावर्तेंनी साधला पवारांवर निशाणा
- “पवारसाहेबांमुळे पंतप्रधान पदावर 2024 ला मराठी नेतृत्व बसणार, मग तो पक्ष भाजप असो कि मविआ” दिपाली सय्यद