पुणे : येणाऱ्या काळात कोणत्याही शहरातील भाजपचा शहराध्यक्ष बदलणार नसल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसापांसून पुणेसह मुंबई, ठाणे भाजपच्या शहर अध्यक्ष बदलाच्या चर्चांना चंद्रकांत पाटलांनी पुर्णविराम दिला आहे.
अन् चक्क रोहित पवारांनी गौतम अदानीच्या गाडीचं सारथ्य केलं; राजकीय वर्तुळात एकच चर्चा
पुण्यात भाजपचा शहराध्यक्ष बदलणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यासंबंधी पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटलांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, आज एक एप्रिल आहे का? एक एप्रिलला जशा बातम्या दिल्या जातात. तशा प्रकारातील ही बातमी आहे, पुणे मुंबई असो वा राज्यातील अन्य कोणत्याही शहराचा अध्यक्ष बदलण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असंही ते म्हणाले.
“बारामती केंद्राला भेट द्याल तेव्हा विज्ञानाचे अनेक चमत्कार बघायला मिळतील”; शरद पवार
पुण्यात सध्या जगदीश मुळीक भाजपचे शहाराध्यक्ष म्हणून काम करीत आहेत. जवळपास 3 वर्षापासून ते शहाराध्याची जबाबदारी पार पाडत आहेत. महापालिकेच्या मागच्या निवडणुकीत योगेश गोगावले हे पक्षाचे शहाराध्यक्ष होते. त्यानंतर जगदीश मुळीक यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली. जगदीश मुळीक यांना हटवून नवा चेहरा आणला जाईल, अशी चर्चा रंगली होती. मात्र चंद्रकांत पाटलांनी त्याला पुर्णविराम सध्यातरी दिला आहे.
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला राष्ट्रवादी काॅंग्रेसचे कडवं आव्हान असणार आहे. राष्ट्रवादीने अजित पवारांना पुणे आणि पिंपची चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे भाजप देखील मोठ्या ताकदीने महापालिका निवडणुक लढविण्याची शक्यता आहे.
Read also:
- विखे पाटलांनी दिलेल्या ऑफरवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले, “आमचं मस्त चाललंय”
- “शरद पवारांचं फक्त नाव वाजवण्यासाठी चर्चा”; गुणरत्ने सदावर्तेंनी साधला पवारांवर निशाणा
- “पवारसाहेबांमुळे पंतप्रधान पदावर 2024 ला मराठी नेतृत्व बसणार, मग तो पक्ष भाजप असो कि मविआ” दिपाली सय्यद
- केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेला रोहित पवारांचा विरोध; अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीच्या घटना
- “आता भाजपला कोणत्याही निवडणुकीत जिंकणं अशक्य”; नाना पटोलेंचा भाजपवर पुन्हा हल्लाबोल