मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता देशात राष्ट्रपती निवडणुक होऊ घातली आहे. त्यासाठी राजकीय पक्षाची मोर्चेाबांधणी सुरू आहेत. राष्ट्रपती पदासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचा प्रस्ताव ममता बॅनर्जी यांनी ठेवला होता. त्याला काॅंग्रेसने देखील पाठिंबा दिला होता. मात्र शरद पवारांनी राष्ट्रपती निवडणुक लढविणार नसल्याचे म्हटले. याच पार्श्वभूमीवर वकील गुणरत्ने सदावर्ते यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
मेडिकलच्या प्रवेशासाठी सीईटीची परिक्षा होते, आयएएस होण्यासाठीही परीक्षा असते. मला वाटतं नाव वाजवण्यासाठी चर्चा ठिक आहे. परंतु राष्ट्रपती पदासाठी बौद्धिक पातळी आवश्यक असते. मला वाटतं शरद पवार यांचं नाव चर्चेतून वाजवलं जात आहे. राष्ट्रपती पदावर यांच्याबद्दल काय बोलणार. ते वयोवृद्ध आहेत. त्यांनीच सांगावं त्यांच्याकडे कुठली उंची आहे. असा सवालही गुणरत्ने सदावर्ते यांनी केला आहे.
“दोन लुटारू भाई भाई अवघा देश लुटून खाऊ”; शरद पवार, अदानी एकाच मंचावर, सदाभाऊंचा टोला
राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारिख २९ जून आहे. त्यासंदर्भातच आज ममता बॅनर्जी, शरद पवार, माजी पंतप्रधान देवगौडा, मल्लिकार्जून खरगे, अखिलेश यादव, मेहबुबा मुक्ती, सुभाष देसाई, इ करीम, जयराम रमेश, प्रफुल्ल पटेल, टी. आर.बालू, यशवंत सिंन्हा, रणदीप सुरजेवाला, प्रियंका चतुर्वेदी, उमर अब्दुला, राजा आदि नेते बैठकीत उपस्थित होते. मात्र शरद पवारांनी साफ नकार दिला.
“मुंबई महापालिका निवडणुकीत ‘मराठी मुलगी’ म्हणून प्रचार करणार”; नवनीत राणांनी पुन्हा दंड थोपटले
शरद पवारांनी नकार दिल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांचं नाव सुचवलं. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष कोणला उमेदवारी देणार ते आता पहावं लागणार आहे. तसेच या निवडणुकीत एनडीचा उमेदवार शर्यतीत सर्वात पुढे आहे. त्यामुळे भाजप कुणाला संधी देणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- “पवारसाहेबांमुळे पंतप्रधान पदावर 2024 ला मराठी नेतृत्व बसणार, मग तो पक्ष भाजप असो कि मविआ” दिपाली सय्यद
- केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेला रोहित पवारांचा विरोध; अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीच्या घटना
- “आता भाजपला कोणत्याही निवडणुकीत जिंकणं अशक्य”; नाना पटोलेंचा भाजपवर पुन्हा हल्लाबोल
- अन् चक्क रोहित पवारांनी गौतम अदानीच्या गाडीचं सारथ्य केलं; राजकीय वर्तुळात एकच चर्चा
- “बारामती केंद्राला भेट द्याल तेव्हा विज्ञानाचे अनेक चमत्कार बघायला मिळतील”; शरद पवार