अहमदनगर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सध्या विविध वक्तव्यावरून चर्चेत आले आहेत. अहमदनगर येथे विरोधात बातमी छापू नये म्हणून पत्रकारांना चहा पाजा, धाब्यावर न्या, असं विधान केल्यानंतर त्यांच्यावर जोरदार टिका करण्यात आली. यातच आता चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक व्हिडीओ काॅंग्रेसचे ट्विट करत निशाणा साधला आहे.
हेही वाचा…भाजपच्या ‘या’ खासदारांचे तिकीट कापणार, फडणवीस-शाह यांची बंद दाराआड चर्चा, नव्या उमेदवारांना संधी
काॅंग्रेस महाराष्ट्राने चंद्रशेखर बावनकुळेंचा व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, भाजपला भारत माता, प्रभू श्रीरामांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदीच मोठे वाटतात हे संतापजनक आहे. म्हणूनच नगर शहर दौऱ्यावर आले असता प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारत मातेच्या घोषणा थांबवून उपस्थितांना नरेंद्र मोदींच्या घोषणा द्यायला लावल्या. दररोज उठल्या बसल्या हिंदू आणि हिंदुत्वाच्या गप्पा मारणारे भाजपावाले किती पाखंडी आहेत हे हे यावरून दिसून येते.
हेही वाचा…पिंपरी-चिंचवडमध्ये ‘आयआयएम’ची शाखा उभारण्याचा संकल्प! महेश लांडगे यांची मागणी, फडणवीसांना दिले निवेदन
अतूल लोंढे यांनी देखील ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपला भारत माता, प्रभू श्रीरामांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदीच मोठे वाटतात हे कसले सनातनी हे तर बोगस ढाब्यावर चला वाले. अहमदनगर शहर दौऱ्यावर आले असता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारत मातेच्या घोषणा थांबवून उपस्थितांना नरेंद्र मोदींच्या घोषणा द्यायला लावल्या. यावरून भाजपचे देशप्रेम किती बेगडी आहे हे दिसून येते. चंद्रशेखर बावनकुळे मोदींचे फोटो असलेली पत्रके वाटताना दिसत असून मोदींच्या नावाच्या घोषणा उपस्थितांना द्यायला सांगत आहेत. यावेळी भारत माता की जय अशी घोषणा देणाऱ्याला त्यांनी हात करून घोषणा बंद करायला सांगत मोदींची घोषणा द्यायला लावल्या. हा प्रकार नगर शहरात एकदा नव्हे तर दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडला आहे.
भाजपला भारत माता, प्रभू श्रीरामांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदीच मोठे वाटतात हे संतापजनक आहे. म्हणूनच नगर शहर दौऱ्यावर आले असता प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारत मातेच्या घोषणा थांबवून उपस्थितांना नरेंद्र मोदींच्या घोषणा द्यायला लावल्या.
दररोज उठल्या बसल्या हिंदू आणि… pic.twitter.com/suPDDqvhvi— Maharashtra Congress (@INCMaharashtra) September 26, 2023
READ ALSO :
हेही वाचा…शिंदे गट ठाकरेंच्या ‘या’ ४ खासदारांवर सर्जिकल स्ट्राईक करण्याच्या तयारीत, कायदेशीर बाजू तपाण्यास सुरूवात
हेही वाचा…भाजपाच्या ‘आयत्या पिठावर’ राष्ट्रवादीच्या इच्छुक ‘नागोबांच्या रेघोट्या’, श्रेय घेण्यासाठी चढाओढ : पण, सत्ता असताना प्रश्न सोडवता आले नाही
हेही वाचा…शिवसेना 16 अपात्र आमदार सुनावणीचं वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी लागणार निकाल
हेही वाचा…एकनाथ शिंदेंच्या सेनेत इनकमिंग सुरूच, ठाकरेंचे ‘तीन’ शिलेदार शिंदेंच्या सेनेत दाखल
हेही वाचा…अजिदादांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भंगणार ? भाजप नेत्यांनी दिले ‘हे’ संकेत