मुंबई : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या वेळी शिंदे गटाकडून ठाकरे गटातील खासदारांना व्हिप बजावला होता. पंरतु ठाकरे गटाच्या खासदारांकडून शिंदे गटाचा व्हिप फेटाळला. यानंतर आता शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या खासदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या खासदारांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचं खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…पिंपरी-चिंचवडमध्ये ‘आयआयएम’ची शाखा उभारण्याचा संकल्प! महेश लांडगे यांची मागणी, फडणवीसांना दिले निवेदन
संसदेत केंद्र सरकारकडून मांडण्यात आलेल्या महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देण्याच्या कृतीवर ठाकरे गटाच्या खासदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. शिंदे गटाच्या प्रतोद भावना गवळी यांनी ठाकरे गटातील खासदार विनायक राऊत, राजन विचारे, संजय जाधव आमि ओमराजे निंबाळकर यांनी व्हीप नाकारल्याचा ठपका ठेवत नोटीस पाठविली आहे. शिंदे गटाचे खासदार राहूल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेची भूमिका मांडली. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…महायुतीतील लोकसभा निवडणुकीचा पहिला उमेदवार ठरला, ? कॅबिनेट मंत्र्यांनी ‘या’ नेत्याचं नाव केलं जाहीर
दरम्यान, संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी शिंदे गटाच्या प्रतोद भावना गवळी यांनी १४ सप्टेंबर रोजी व्हीप काढला होता. महिला आरक्षण विधेयकाच्या बाजूने शिवसेना खासदारांनी मतदान करावं, असं भावना गवळी यांनी व्हीपद्वारे म्हटलं होतं. परंतु ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर, संजय जाधव हे हजर राहिले नसल्यामुळे त्यांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केलेले नाही. त्यामुळे शिंदे गटाने यासंदर्भात कायदेशीर बाजू तपासण्यात सुरूवात केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…भाजपाच्या ‘आयत्या पिठावर’ राष्ट्रवादीच्या इच्छुक ‘नागोबांच्या रेघोट्या’, श्रेय घेण्यासाठी चढाओढ : पण, सत्ता असताना प्रश्न सोडवता आले नाही
हेही वाचा…शिवसेना 16 अपात्र आमदार सुनावणीचं वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी लागणार निकाल
हेही वाचा…एकनाथ शिंदेंच्या सेनेत इनकमिंग सुरूच, ठाकरेंचे ‘तीन’ शिलेदार शिंदेंच्या सेनेत दाखल
हेही वाचा…अजिदादांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भंगणार ? भाजप नेत्यांनी दिले ‘हे’ संकेत
हेही वाचा…भाजपच्या ‘या’ खासदारांचे तिकीट कापणार, फडणवीस-शाह यांची बंद दाराआड चर्चा, नव्या उमेदवारांना संधी