मुंबई : शिवसेना १६ अपात्र आमदार याचिकासंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणीसंदर्भात आजच कोर्टात वेळापत्रक दाखल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणाबाबत कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना एका आठवड्याची मुदत दिली होती. त्यासंदर्भात अलिकडेच सुनावणी पार पाडली असून आता सुनावणीबाबत वेळापत्रकानुसार पुढील कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…पक्ष फुटीनंतर शरद पवारांना अजून एक मोठा धक्का, ३० वर्षापासूनची सत्ता गेली, ‘या’ निवडणुकीत मोठा पराभव
विधानसभा अध्यक्ष कोर्टाला सादर करण्यात येणाऱ्या वेळापत्रकानुसार १३ ते २० ऑक्टोंबर दरम्यान कागदपत्रांची तपासणी होणार आहे. यातच सर्व याचिका एकत्र करायचा की नाही यावर १३ तारखेला सुनावणी होणार आहे. यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांना दिलेली कागदपत्रांची विधिमंडळ तपासणी करणार आहे. तसेच २० ऑक्टोंबरला सर्व याचिका एकत्रित करायच्या की नाही यावर निकाल दिला जाणार आहे.
हेही वाचा…“भारत मातेच्या घोषणा थांबवून मोदींच्या घोषणा,” बावनकुळेंचा आणखी एक व्हिडीओ चर्चेत
दरम्यान, दोन्ही गटातील आपलं म्हणणं मांडल्यानंतर २७ ऑक्टोंबर तारिख ठेवण्यात आली आहे. त्यानंतर दोन्ही गट आपापले मुद्देसुद मांडणी ६ नोव्हेंबरला करतील आणि दावे प्रतिदावे करतील. त्यानंतर १० नोव्हेंबरला दोन्ही गटांनी मांडलेल्या मुदद्यांच्या अनुषंगाने सुनावणी पार पडणार आहे. तर २० ऑक्टोंबरला दोन्ही गटांच्या साक्षीदारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. तर २३ ऑक्टोंबरला साक्षीदारांची उलट साक्ष घेतली जाणार आहे. सर्व पुरावे तापसल्यानंतर पुढील दोन आठवड्यात अंतिम सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे या निकालाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…एकनाथ शिंदेंच्या सेनेत इनकमिंग सुरूच, ठाकरेंचे ‘तीन’ शिलेदार शिंदेंच्या सेनेत दाखल
हेही वाचा…अजिदादांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भंगणार ? भाजप नेत्यांनी दिले ‘हे’ संकेत
हेही वाचा…भाजपच्या ‘या’ खासदारांचे तिकीट कापणार, फडणवीस-शाह यांची बंद दाराआड चर्चा, नव्या उमेदवारांना संधी
हेही वाचा…पिंपरी-चिंचवडमध्ये ‘आयआयएम’ची शाखा उभारण्याचा संकल्प! महेश लांडगे यांची मागणी, फडणवीसांना दिले निवेदन
हेही वाचा…महायुतीतील लोकसभा निवडणुकीचा पहिला उमेदवार ठरला, ? कॅबिनेट मंत्र्यांनी ‘या’ नेत्याचं नाव केलं जाहीर