पिंपरी । विशेष प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत समाविष्ट गावांच्या विकासाचा अनुशेष भरुन काढण्याच्या मुद्यांवर २०१४ मध्ये विधानसभा आणि २०१७ मध्ये महापालिका निवडणूक लढवण्यात आली. शहरात २० वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना समाविष्ट गावांचा विकास करता आला नाही. त्यामुळे भाजपाच्या बाजुने जनमत झुकले. राष्ट्रवादीला पराभवाचा सामाना करावा. महापालिकेत सत्ता परिवर्तनानंतर भाजपाने प्रलंबित प्रश्न सोडवण्यास गती दिली. त्याचा फायदा भाजपाचे स्थानिक नेते दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांना झाला.
१९९२ पासून २०१७ पर्यंत सुरूवातील काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीच्या माध्यमातून महापालिका सत्तेत असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांना समाविष्ट गावांना न्याय देता आला नाही. आमदार महेश लांडगे यांनी २०१४ मध्ये समाविष्ट गावांच्या विकासाचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला. अपक्ष निवडून आलेल्या लांडगे यांनी २०१७ मध्ये भाजपात प्रवेश केला. त्यानंतर समाविष्ट गावांतील प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्यात आले. याचे श्रेय आमदार लांडगे आणि भाजपाला मिळाले. २०१९ मध्ये पुन्हा भोसरी विधानसभा मतदार संघात लांडगे यांनी बाजी मारली.
हेही वाचा…महायुतीतील लोकसभा निवडणुकीचा पहिला उमेदवार ठरला, ? कॅबिनेट मंत्र्यांनी ‘या’ नेत्याचं नाव केलं जाहीर
कारण, समाविष्ट गावांवर कायम अन्याय केल्याची भावना स्थानिक नागरिकांमध्ये होती. त्याचे रुपांतर मतात झाले. राष्ट्रवादीला अधिकृत उमेदवारही देता आला नाही. २०१९ मध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली. त्या अडीच-तीन वर्षांच्या काळात महापालिकेत प्रशासक राजवट सुरू झाली. समाविष्ट गावांसह पिंपरी-चिंचवडचे प्रश्न राज्य सरकारकडून सोडवण्याची संधी असताना राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी भाजपावर चिखलफेक आणि पत्रकबाजी करीत चमकोगिरी करण्यात धन्यता मानली.
दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोळसले. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात आमदार महेश लांडगे यांनी शहराचे प्रश्न विधानसभा सभागृहात प्रभावीपणे मांडले. त्यामुळे शास्तीकर, प्राधिकरण परतावा, सोसायटीधारकांच्या समस्या, महावितरण समस्या, भामा आसखेड योजना, आंद्रा योजना, पंतप्रधान आवास योजना, उपयोगकर्ता शुल्क, मोशी हॉस्पिटल, पिंपरी-चिंचवड न्यायालयची इमारत, यासह समाविष्ट गावांत रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले. त्याला राज्य सरकारकडून पाठबळ मिळवले. राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार असताना शहरातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपाच्या कामांना विरोध करणे किंवा आरोप-प्रत्यारोप करणे यावर भर दिला.
हेही वाचा…पक्ष फुटीनंतर शरद पवारांना अजून एक मोठा धक्का, ३० वर्षापासूनची सत्ता गेली, ‘या’ निवडणुकीत मोठा पराभव
पवना प्रकल्पाचा बेगडीपणा चव्हाट्यावर…
जुलै-२०२३ मध्ये अजित पवार महायुती सरकारमध्ये सहभागी झाले. राज्याचे उपमुख्यमंत्रीपद मिळाले. पुन्हा राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी आपली चाल बदलली. ज्या मुद्यांवर आरोप करण्यात धन्यता मानली. त्याच मुद्यांचे श्रेय घेण्याची धडपड अजित पवार यांच्या बगलबच्छांनी सुरू केली. पवना थेट जलवाहिनी प्रकल्पाची स्थगिती उठवण्याचा निर्णय झाला. तेव्हा शहरात ‘अजित पवार यांचे पिंपरी-चिंचवडकरांना गिफ्ट’ असे बॅनर उभारण्यात आले. मात्र, अजित पवार यांना याबाबत काहीही माहिती नाही, असा दावा मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची बेगडी चमकोगिरी चव्हाट्यावर आली.
हेही वाचा…“भारत मातेच्या घोषणा थांबवून मोदींच्या घोषणा,” बावनकुळेंचा आणखी एक व्हिडीओ चर्चेत
समाविष्ट गावांच्या रस्त्यांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न…
सत्तेत असताना राष्ट्रवादीच्या इच्छुक आणि माजी नगरसेवकांना रस्ते, आरक्षणांचा विकास, पाणी प्रश्न मार्गी लावण्याचे शहाणपण सूचले नाही. आमदार लांडगे यांनी २०१४ पासून समाविष्ट गावांच्या विकासाचा बॅकलॉग भरुन काढण्यासाठी केलेला पाठपुरावा, २०१७ मध्ये भाजपाच्या माध्यमातून झालेले काम आणि आता महायुती सरकारच्या काळात विकासकामांचा धडाका सुरू आहे. त्यांनी भोसरी मतदार संघात केलेल्या कामामुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांची प्रतिमा ‘विकासाभिमूख नेता’ अशी झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा आमदार लांडगे यांना मिळालेला जनधार पाहाता राष्ट्रवादीच्या इच्छुकांची अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत कोणत्या मुद्यांवर लोकांसमोर जायचे? हा प्रश्न सतावत असून, केवळ बिनबुडाच्या आरोपांवर मतदार मत देणार नाहीत, याची जाणीव झाल्यामुळे पत्रकबाजी करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आडून आपली जागा सुरक्षित करण्याची केविलवानी धडपड पहायला मिळत आहे. ही राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांसह स्थानिक पदाधिकारी आणि इच्छुकांसाठी आत्मचिंतन करायला लावणारी बाब आहे.
READ ALSO :
नशिवसेना 16 अपात्र आमदार सुनावणीचं वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी लागणार निकाल
हेही वाचा…एकनाथ शिंदेंच्या सेनेत इनकमिंग सुरूच, ठाकरेंचे ‘तीन’ शिलेदार शिंदेंच्या सेनेत दाखल
हेही वाचा…अजिदादांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भंगणार ? भाजप नेत्यांनी दिले ‘हे’ संकेत
हेही वाचा…भाजपच्या ‘या’ खासदारांचे तिकीट कापणार, फडणवीस-शाह यांची बंद दाराआड चर्चा, नव्या उमेदवारांना संधी
हेही वाचा…पिंपरी-चिंचवडमध्ये ‘आयआयएम’ची शाखा उभारण्याचा संकल्प! महेश लांडगे यांची मागणी, फडणवीसांना दिले निवेदन