पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी केली जाऊ शकते. शिखर बॅंक कथित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांच्या आर्थिक गुन्हेशाखेने परवानगी मागितली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. याच प्रकरणावर अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“निवडणुका झाल्यावर आकड्यांचा जो दावा केला जातो त्याला अर्थ नाही”
मी एक या देशाचा नागरिक असून संविधान, कायदा मानणारा माणुस आहे. त्यामुळे माझी जे कुणी चौकशी करतील त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची माझी तयारी आहे अशी स्पष्ट भूमिका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत मांडली. पुन्हा एकदा तुमची चौकशी होणार असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
संजय शिरसाठ यांना ह्दयविकाराचा झटका..! मुख्यमंत्र्यांचा डॉक्टरांना तात्काळ फोन
हे प्रकरण २०१२ पासूनचे आहे. प्रत्येक वेळी अजित पवारांचे नांव येते. अजित पवार आणि ७५ लोक मात्र त्या ७५ लोकांची नावे येत नाही. फक्त अजित पवार यांचे नाव, फोटो, हेडलाईन होते. मात्र त्यांचे सरकार आहे काय चौकशी करायची ती करा असेही अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. माझी चौकशी सहकार विभागामार्फत, निवृत्त न्यायाधीशांमार्फत, सीआयडी, एसीबी आणि आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने केली. मात्र आता आर्थिक गुन्हा अन्वेषण विभाग चौकशी करणार अशी पुन्हा बातमी कानावर आली आणि तुमच्या माध्यमातून वाचली, पाहिली परंतु याबाबत मला माहिती नाही असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
“भर मांडवात नवरदेव हाकलून द्यावा अशी भाजपची अंधेरीच्या निवडणुकीत गत”
दरम्यान, अजित पवार यांच्यावर इतर 75 जणांविरोधात शिखर बॅंक घोटाळ्याप्रकरणी पुढील कारवाई करण्यासाठीचे ठोस पुरावे सापडले नसल्याचे सांगत हे प्रकरण बंद करण्याची मागणी करणारा अहवाल ईओडब्ल्यूने यापुर्वी न्यायालयात सादर केला होता.
Read also
- “भाजपच्या सत्तेत पुणे महानगरपालिकेने 1000 कोटींचा भ्रष्टचाराचा गाळ”; चौकशी करणार का..?
- “स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवून भाजपनं पुणे शहराचं वाटोळं करून ठेवलं” अजित पवार
- “शिंदे-फडणवीस सरकार महाराष्ट्रात हुकूमशाही रूजवू पाहत आहे का?”; काॅंग्रेसचा सवाल
- “माझ्या जीवाला काही झालं तर मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री जबाबदार”; सेनेच्या खासदाराचं पत्र
- अमोल मिटकरींनी बावनकुळे, शेलार, राणे, अन् सोमय्यांना डिवचलं..! म्हणाले, “तुमचा दिवाळी फराळ”