पुणे : जोरदार पाऊस झाल्यानंतर काल आणि आज पुणे शहरात ठिकठिकाणी पाऊस साचलं. अनेक ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने वाहतुक व्यवस्थेवर मोठा ताण पडला. यानंतर पुण्यातील रस्त्यावरून पाणी वाहत असलेले व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. यानंतर आता राष्ट्रवादीने सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
संजय शिरसाठ यांना ह्दयविकाराचा झटका..! मुख्यमंत्र्यांचा डॉक्टरांना तात्काळ फोन
नालेसफाईच्या नावाखाली भाजपच्या सत्तेत पुणे महानगरपालिकेने 1000 कोटींचा भ्रष्टचाराचा गाळ केला. तोच गाळ आता पुण्याचे नाले तुंबण्यासाठी कारणीभूत ठरतोय. हिम्मत असेल तर देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी या नालेसफाईंची सीबीआय किवा इडी कडून चौकशी करावी असं खुल आवाहन राष्ट्रवादीचे पुणे शहराचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे.
“भर मांडवात नवरदेव हाकलून द्यावा अशी भाजपची अंधेरीच्या निवडणुकीत गत”
स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवून भाजपनं पुणे शहराचं पार वाटोळं करून ठेवलं आहे. काल सायंकाळी अतिवृष्टीमुळे भाजपशासित पुणे मनपानं पुण्यात काय दिवे लावलेत याची कल्पना येते. लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. मनपाला ‘अव्यवस्थेची’ कारणं काय आहेत ती सांगावीच लागतील. असं म्हणत अजित पवार यांनी भाजपला सुनावलं.
” मग भाजपचं संस्कृत राजकाऱण कोल्हापुर अन् पंढरपुरच्या निवडणुकीत दिसलं असतं”
सर्व प्रशासकीय यंत्रणा आवश्यक ती पाऊलं उचलून स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर काम करत असून त्याचा आढावा आम्ही घेत आहोत. तूर्तास पुण्यातील जनतेला आवश्यक ती सर्व मदत करणं गरजेचं आहे. यासाठी आम्ही पाठपुरावा करतंच आहोत. जनतेनं देखील आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन देखील अजित पवार यांनी केलं आहे.
Read also
- “स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवून भाजपनं पुणे शहराचं वाटोळं करून ठेवलं” अजित पवार
- “शिंदे-फडणवीस सरकार महाराष्ट्रात हुकूमशाही रूजवू पाहत आहे का?”; काॅंग्रेसचा सवाल
- “माझ्या जीवाला काही झालं तर मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री जबाबदार”; सेनेच्या खासदाराचं पत्र
- अमोल मिटकरींनी बावनकुळे, शेलार, राणे, अन् सोमय्यांना डिवचलं..! म्हणाले, “तुमचा दिवाळी फराळ”
- “निवडणुका झाल्यावर आकड्यांचा जो दावा केला जातो त्याला अर्थ नाही”