नागपूर : मी मोदीला मारुही शकतो आणि शिव्याही देऊ शकतो, असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना त्यांचा तोल ढळला. भाषणाच्या आवेशात त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली. याच पार्श्वभूमीवर आता समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.
फडणवीसांचा एक मास्टरस्ट्रोक आणि महेश लांडगेंची गोव्यात एन्ट्री
भंडारा जिल्ह्यात काल जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या मतदार संघात निसटता पाय मजबूत करण्यासाठी विविध ठिकाणी सभा घेतल्या. काल संध्याकाळी घेण्यात आलेल्या प्रचार सभेदरम्यान नाना पटोले यांनी मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो असे वक्तव्य केलं. तसा व्हिडीओ भंडारा जिल्ह्यात वायरल होत असून मोदी समर्थकांमध्ये पटोले यांच्याविरोधात रोष निर्माण झाला आहे.
नागवडे सहकारी साखर कारखान्यात आमदार बबनराव पाचपुते गटाचा दारुण पराभव
नाना पटोले यांच्या बोलण्याची स्टाईल नेहमी आवेशपूर्ण असते. अतिशय तावातावात बोलताना ते नेहमी दिसून येतात. भंडाऱ्यातल्या सभेतला व्हायरल व्हिडीओत नाना पटोले म्हणत आहेत की, “मी का भांडतो? मी मागील 30 वर्षापासून राजकारणात आहे. लोकं ५ वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करतात. शाळा, कॉलेज करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढी वर्ष झालीय राजकारण करतोय पण एक शाळा माझ्या नावावर नाही. इथून पाठीमागे एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला कायम मदत करतोय. म्हणून मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला. एक प्रमाणिक नेतृत्व तुमच्या समोर उभा आहे.
Read also:
- ५ वर्ष न केलेल्या कामाचं अपयश ते लुंगीमागे लपवत आहे; शिवेंद्रराजेंची उदयनराजेंच्या डान्सवर प्रतिक्रिया
- मेट्रोची पाहणी करायला शहरात शरद पवार आले, महापौरांना नाही बोलवले
- “चंद्रकांत पाटील हे काही राजकीय चर्चेचे केंद्रबिंदू नाहीत, त्यांच्या बोलण्याने फरक पडत नाही”;
- “मुख्यमंत्री साहेब प्रश्न विचारायला नाही तर सोडवायला अक्कल लागते”; चित्रा वाघ यांचा ठाकरेंना सणसणीत टोला
- ठाण्यात खारेगाव रेल्वेच्या पुलाच्या कामाच्या श्रेयवादावरून राष्ट्रवादी-सेनेत जुंपली