सातारा : सातारा जिल्ह्यातील राजकारण म्हटलं की दोन छत्रपतींमधील राजकीय संघर्ष समोर येतो. छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे. आता पुन्हा एकदा हा संघर्ष चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील अडीच हजार एसटी कर्मचाऱ्यांना चंद्रकांत दादा शिधा वाटप करणार
पुष्पा या चित्रपटाची भुरळ छत्रपती उदयनराजेंना पडली होती. रविवारी त्यांनी कार्यकर्त्यांसोबत हा चित्रपट थेटरमध्ये जाऊन पाहिला. चित्रपटातील हिरोसारखी लुंगी घालण्याचा मोह देखील राजेंना आवरला नाही. आपल्या दबंग स्टाईलमध्ये राजेंनी लुंगी घालून काही फोटो देखील काढले आणि चित्रपटातील एका गाण्यावर डान्स देखील केला. सोशल मीडियावर राजेंचा व्हिडिओ कमालीचा व्हायरल झाला. यावर छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
राजेश टोपेजी तुम्ही डॉक्टर आहात, मग इंदुरीकरांना दरवेळी का पाठीशी घालतायं? तृप्ती देसाई
सातारा जिल्ह्यात आगामी काळात निवडणूका आहेत. त्यामुळे खासदारांचे असे अनेक डान्स लोकांना पाहायला मिळणार नाही. त्यांनी कोणतंही विकास काम केलेलं नाही. काम न केल्यामुळे कामाचं अपयश ते या लुंगीमागे लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. नगरपालिका निवडणुका तोंडावर असल्यामुळे हा सगळा प्रकार असून सातारकरांनी उदयनराजेंच्या या कृत्याकडे मनोरंजन म्हणून पहावं, असा टोला आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मारला आहे.
फडणवीसांचा एक मास्टरस्ट्रोक आणि महेश लांडगेंची गोव्यात एन्ट्री
खासदार उदयनराजे हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. त्यांची हटके स्टाईल असो वा त्यांची एखाद्यावर टीका असो, त्यांची एक वेगळीच पद्धत असते आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांत त्यांची चांगलीच क्रेज आहे. त्यामुळे आता आमदार शिवेंद्रराजेंच्या या टीकेवर आता खासदार उदयनराजे काय प्रत्युत्तर देणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
Read also:
- मेट्रोची पाहणी करायला शहरात शरद पवार आले, महापौरांना नाही बोलवले
- “चंद्रकांत पाटील हे काही राजकीय चर्चेचे केंद्रबिंदू नाहीत, त्यांच्या बोलण्याने फरक पडत नाही”;
- “मुख्यमंत्री साहेब प्रश्न विचारायला नाही तर सोडवायला अक्कल लागते”; चित्रा वाघ यांचा ठाकरेंना सणसणीत टोला
- ठाण्यात खारेगाव रेल्वेच्या पुलाच्या कामाच्या श्रेयवादावरून राष्ट्रवादी-सेनेत जुंपली
- नागवडे सहकारी साखर कारखान्यात आमदार बबनराव पाचपुते गटाचा दारुण पराभव; राजेंद्र नागवडेंनी २१च्या २१ जागा जिंकल्या