मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात समाजप्रबोधनकार समजले जाणारे अहमदनगर जिल्ह्यातील कीर्तनकार निवृत्ती देशमुख इंदुरीकर महाराज हे नव्या वादात अडकले आहेत. पुन्हा त्यांनी कोरोनावर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावरून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी इंदुरीकर महाराजांवर कारवाई व्हावी अशी सरकारकडे मागणी केली आहे.
तब्येत बरी होईपर्यंत उद्धव ठाकरे यांनी अन्य नेत्याकडे पदभार सोपवावा – चंद्रकांत पाटील
इंदुरीकर यांनी काही दिवसांपूर्वी पूत्रप्राप्तीसंबंधी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण अद्याप न्यायालयात सुरू आहे. अशातच आता त्यांनी कोरोनासंसर्गाबद्दल वक्तव्य केले आहे. इंदुरीकर महाराज म्हणाले की, मी माळकरी असल्याने मला कोरोना होणार नाही मात्र माळ काढणाऱ्यांना कोरोना गाठणारच, असे वादग्रस्त वक्तव्य इंदुरीकरांनी कीर्तनातून केले. मात्र अशा वक्तव्याने ते समाजात अंधश्रद्धा पसरवत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही इंदुरीकरांना दरवेळी का पाठीशी घालताय, त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.
आता एसटीमध्ये खासगी, सेवानिवृत्त चालक घेतले जाणार; व्यवस्थापकीय संचालकांची मोठी घोषणा
तृप्ती देसाई म्हणाल्या की, मी माळकरी आहे म्हणून मला कोरोना होणार नाही आणि माळ काढणाऱ्यांना कोरोना गाठणारचं असे सांगून कीर्तनाच्या माध्यमातून इंदुरीकर अंधश्रद्धा पसरवत आहेत. कोरोना ही महाभयंकर महामारी असून सध्या तिसरी लाट आपल्या देशात आहे. याआधी अनेक जणांना कोरोनामुळे मृत्यूला सामोरे जावे लागले आहे तर अनेक जण मृत्यूच्या दारातून बाहेर आले आहेत, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच सरकार सुद्धा जनजागृती करत आहेच, परंतु स्वतःला कीर्तनकार म्हणविणारे इंदुरीकर पुन्हा एकदा असे वक्तव्य करून अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत.
त्यांनी पुढे म्हटल्या आहे की, सरकारमधील नेते आणि विरोधी पक्षातील नेते यांनी ठेवलेल्या प्रवचनाला इंदुरीकर यांना बोलविले जाते आणि गर्दी जमा होते, आता लवकरच निवडणुका आहेत केवळ म्हणूनच दरवेळी त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न या सर्व नेत्यांकडून केला जातो. या आधी सुद्धा त्यांच्या कोरोनावरील वक्तव्यावर सरकारने कोणतीही कारवाई न करता सूट दिली होती परंतु हिम्मत असेल तर आणि आपल्या राज्यात सर्वांना कायदा समान असेल तरच या सरकारने इंदुरीकरांवर त्यांनी केलेल्या वक्तव्यावर गुन्हा दाखल करावा. अन्यथा अंधश्रद्धा पसरवण्यात सरकारसुद्धा सामील आहे असे जनतेला वाटेल, असे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे.
Read also:
- …तर प्रश्न विचारायला फार अक्कल लागत नाही; आशिष शेलारांच मुख्यमंत्र्यांना प्रत्यूत्तर
- पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा उद्रेक; कडक निर्बंध लागणार? आज होणार निर्णय
- पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात? अजितदादा म्हणतात… मी आणि वळसे पाटील…
- सिंधुदुर्गमध्ये फक्त नारायण राणेंचीच हवा; जिल्हा बँकेतील ठाकरे, पवार, गांधी यांचे फोटो हटवले
- पार्थ पवारांनी घेतली अजित पवार यांची भेट; पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये तब्बल दोन तास खलबतं