पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक होणार आहे. अध्यक्षपदी जुन्या आणि उपाध्यक्षपदी नवीन चेहऱ्याला संधी देण्याची राष्ट्रवादीची रणनीती ठरल्याची माहिती आहे. दुपारी एक वाजता निवडणूक होणार असून त्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार सर्व संचालकांची बैठक घेत आहेत. जिल्हा बँक सहकारी बँकेची 21 लोकांची निवडणूक झाली. काही जण बिनविरोध झाले. काही निवडणुकीच्या माध्यमातून संचालक पदावर आले.
आमदार श्वेता महालेंनी खोचले पदर; बँकेच्या व्यवस्थापकास झाप-झाप झापले, काय घडलं नेमकं…
अजित पवार यांनी दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष संजय जगताप आणि काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली. मी आणि दिलीप वळसे पाटील जो निर्णय घेऊ तो मान्य असेल, असं संचालक म्हणाल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे. जिल्हा बँकेची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध होईल, असं अजित पवार म्हणाले.
चित्रा ताई… “तेरे वार पर पलटवार हु मै”; राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांचा निशाणा
फेक फोन कॉलसंदर्भात पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अतुल गोयलला फोन गेला होता त्यावेळी सॉफ्टवेअरचा वापर केल्यानं त्याच्याकडेन नाव गेलं. नाव गेल्यानं त्याला संशय आला. दिलीप वळसे पाटील यांनी हे प्रकरण सायबरला कळवण्यास सांगितलं. त्याप्रमाणे सहा जणांना ताब्यात घेतलंय, असं अजित पवार म्हणाले.
तब्येत बरी होईपर्यंत उद्धव ठाकरे यांनी अन्य नेत्याकडे पदभार सोपवावा – चंद्रकांत पाटील
कोरोना आढावा बैठकीला गेल्यानंतर त्याबाबत चर्चा होईल. कोरोनासंदर्भात राज्याचे निर्णय उद्धव ठाकरे घेत असतात. जिल्ह्याचा आढावा मी घेत असतो. राज्यात ज्यावेळी 700 मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असं अजित पवार म्हणाले.
Read also:
- सिंधुदुर्गमध्ये फक्त नारायण राणेंचीच हवा; जिल्हा बँकेतील ठाकरे, पवार, गांधी यांचे फोटो हटवले
- पार्थ पवारांनी घेतली अजित पवार यांची भेट; पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये तब्बल दोन तास खलबतं
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे “पाणी तेरा रंग कैसा, जिसमे मिलाया उसके जैसा “; फडणवीसांनी पवारांना पुन्हा डिवचले
- आता एसटीमध्ये खासगी, सेवानिवृत्त चालक घेतले जाणार; व्यवस्थापकीय संचालकांची मोठी घोषणा
- धनंजय मुंडे स्वतःहून मला म्हणतील, ‘पम्मी तुम जिती मै हारा’; करूणा मुंडेचा दावा