सिंधुदुर्ग : राज्यात गेल्या महिन्याभरापासून राजकारण तापलं आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने ११ जागा मिळवत सत्ता मिळवली. दुसरीकडे महाविकास आघाडीने ८ जागांवर विजय मिळवला.
तिसरी लाट आली, ठाकरे सरकार लवकर जागे व्हा; नागपूर खंडपीठाने सरकारला फटकारलं
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी राजकारणाला अक्षरशः ऊत आला होता. आमदार नितेश राणे यांनी आणि त्यांचे साथीदार मनीष दळवी, गोट्या सावंत यांनी माझ्यावर जीवघेणा हल्ला घडवून आणला असा आरोप शिवसैनिक संतोष परब यांनी केला होता. यानंतर आमदार नितेश राणे हे १६ दिवस अन्यातवासात गेले होते.
आमदार श्वेता महालेंनी खोचले पदर; बँकेच्या व्यवस्थापकास झाप-झाप झापले, काय घडलं नेमकं…
जिल्हा बँकेत सत्ता आल्यानंतर नारायण राणे यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचले आहे. जिल्हा बँकेत मागील काळात अध्यक्षांच्या खुर्चीच्या मागच्या बाजूस शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे फोटो लावण्यात आले होते.
चित्रा ताई… “तेरे वार पर पलटवार हु मै”; राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांचा निशाणा
जिल्हा बँकेत राणेंची सत्ता येताच ठाकरे, पवार यांचे फोटो काढण्यात आले आहेत. त्या जागेवर आता फक्त दैवत गणपती बाप्पा यांचा फोटो लावण्यात आला आहे आणि शेजारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा फोटो लावण्यात आला आहे. ठाकरे, पवार, गांधी यांचे फोटो काढून राणेंचा फोटो कुणी लावला हे सर्वांनाच माहित आहे. आता या सर्व प्रकाराला नक्कीच शिवसेना, राष्ट्रवादीकडून उत्तर येईल अशी चर्चा सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात रंगली आहे.
Read also:
- पार्थ पवारांनी घेतली अजित पवार यांची भेट; पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये तब्बल दोन तास खलबतं
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे “पाणी तेरा रंग कैसा, जिसमे मिलाया उसके जैसा “; फडणवीसांनी पवारांना पुन्हा डिवचले
- आता एसटीमध्ये खासगी, सेवानिवृत्त चालक घेतले जाणार; व्यवस्थापकीय संचालकांची मोठी घोषणा
- धनंजय मुंडे स्वतःहून मला म्हणतील, ‘पम्मी तुम जिती मै हारा’; करूणा मुंडेचा दावा
- तब्येत बरी होईपर्यंत उद्धव ठाकरे यांनी अन्य नेत्याकडे पदभार सोपवावा – चंद्रकांत पाटील