पुणे : संपूर्ण राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. मुंबईत कोरोना बाधितांच्या संख्येत काही प्रमाणात घसरण झाली असली तरी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात कोरोना बाधितांचा आकडा काही कमी होताना दिसत नाहीये. त्यामुळे आता पुण्यात कठोर निर्बंध लागू करण्यात येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना स्थितीचा आढावा घेणारी बैठक होत आहे या बैठकीत कठोर निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे.
तब्येत बरी होईपर्यंत उद्धव ठाकरे यांनी अन्य नेत्याकडे पदभार सोपवावा – चंद्रकांत पाटील
उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा बैठक घेणार आहेत. दुपारी 4 वाजता ही बैठक होणार आहे. विभागीय आयुक्त कार्यलयात ही बैठक होणार आहे. या बैठकीत पुण्यात कठोर निर्बंध लावण्याच्या संदर्भात चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुण्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत होणारी वाढ कायम असल्याचं दिसत आहे. ही रुग्णांची संख्या रोखण्यासाठी आता कठोर निर्बंध लावणं आवश्यक असल्याचं बोललं जात आहे.
धनंजय मुंडे स्वतःहून मला म्हणतील, ‘पम्मी तुम जिती मै हारा’; करूणा मुंडेचा दावा
पुण्यात काल (14 जानेवारी 2022) 5480 कोरोना बाधितांची नोंद झाली आणि 2674 रुग्णांनी करोनावर मात केली. आजपर्यंत पुण्यातील कोरोना बाधितांची खएकूण संख्या 548569 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत 510793 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर पुण्यात 13 जानेवारी रोजी 5571 नव्या रुग्णांची नोंद झाली होती आणि 2335 रुग्णांनी कोरोनावर मात केली होती.
Read also:
- पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात? अजितदादा म्हणतात… मी आणि वळसे पाटील…
- सिंधुदुर्गमध्ये फक्त नारायण राणेंचीच हवा; जिल्हा बँकेतील ठाकरे, पवार, गांधी यांचे फोटो हटवले
- पार्थ पवारांनी घेतली अजित पवार यांची भेट; पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये तब्बल दोन तास खलबतं
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे “पाणी तेरा रंग कैसा, जिसमे मिलाया उसके जैसा “; फडणवीसांनी पवारांना पुन्हा डिवचले
- आता एसटीमध्ये खासगी, सेवानिवृत्त चालक घेतले जाणार; व्यवस्थापकीय संचालकांची मोठी घोषणा