अमरावती : महायुतीच्या अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर टिका करतांना दिसत आहेत. यातच संजय राऊतांचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात आता नटीला नटी म्हणणार नाही तर काय म्हणणार ? ती डान्सर आहे. आता आम्ही गणपत पाटलांना प्रेमाने नाच्या म्हणतोय की अॅक्टर्स म्हणायला मला इंग्लिश येत नाही असं म्हटलं आहे. त्यावरून राणांनी राऊतांना चांगलचं सुनावलं आहे.
हेही वाचा…“अर्चना पाटील या देखील घरातलीच सुन”, धाराशिवच्या सभेतून अजित पवारांचा शरद पवारांना टोला
नवनीत राणा म्हणाल्या की, जनाब संजय राऊत, अमरावतीला येऊन नवनीत राणांना गाडण्याची भाषा केली. एक लक्षात ठेवा. ही अमरावती आहे. या अमरावतीत तुमच्यासारखे ५६ गाडण्याची ताकद आहे. नवनीत राणाविरोधात ज्या भाषेत टीका केली. १४ दिवस जेलमध्ये ठेवून समाधान झाले नाही. परत तुम्ही अमरावतीला येऊन अशी भाषा बोलता.
हेही वाचा…“ही निवडणुक गावकी-भावकीची नाही, तर…” आढळरावांनी काढला कोल्हेंचा चिमटा
“कोण आहे संजय राऊत? सीतेला पण भोग चुकले नाही. आपण तर राजकारणात आहे. संजय राऊतांनी बोलताना ज्या मुलीचे कन्यादान केले आणि ज्या मातेच्या पोटी जन्म घेतला तिच्याकडे पाहायला हवे होते. माझ्यावर टीका करण्याअगोदर आपल्या पत्नीकडे तरी एकदा पाहायचे होते. एखादी महिला जर बाहेर येऊन काम करते तर ती तिचा स्वाभिमान विकत नाही. अमरावतीची तर सून आहे. नवनीत राणांसोबत अमरावतीतील प्रत्येक महिलेचा स्वाभिमान, सन्मान जोडला गेला आहे. असेही त्या म्हणाल्या.
READ ALSO :
हेही वाचा…“इथली ‘कोणतीही मानसिकता’ रोखू शकणार नाही,”शशिकांत शिंदेंनी विरोधकांना दिला इशारा
हेही वाचा…“मोदींविरोधात जनतेत संतापाची लाट “, लातुरमधून बाळासाहेब थोरांताचा हल्लाबोल