जळगाव : राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे सातत्याने भाजपवर विशेषत : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका करतांना दिसत आहेत. मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असतांना फडणवीसांनी कुरघोडी करत माझ्याकडील मुख्यमंत्री पद हिसकावलं, अन् भष्टाचाराच्या आरोपाखाली पक्षातून दूर केला असा आरोप खडसेंनी पुन्हा एकदा केलाय.
हेही वाचा…“तुम्ही अडीच वर्ष माशा मारत होतात का ?”, फडणवीसांचा ठाकरेंना खोचक सवाल
मी देवेंद्र फडणवीस यांना अनेक गोष्टी शिकवल्या. २०१४ च्याआधी विरोधी पक्षनेता असताना माझ्या मागची जागा त्यांना दिली. माझ्याऐवजी त्यांना बोलण्याची अनेकवेळा संधी दिली. महाराष्ट्रातील अनेक प्रश्न त्यांनी उचलले. त्यामध्ये त्यांचेदेखील कौशल्य होते. मात्र, नंतरच्या कालखंडात त्यांनी कुरघोडी केली. ज्या व्यक्तीला घडविले, त्यांनी व्यक्तिगतरित्या माझा छळ करणे योग्य वाटत नाही. असं खडसेंनी म्हटलं.
हेही वाचा…मोठी बातमी…! छत्रपती संभाजीनगर अन् धाराशीव शहाराच्या नामांतरणाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
दरम्यान, ‘देवेंद्र फडणवीसांना राजकीय नेते म्हणून घडविण्यात व भाजपा प्रदेशाध्यक्ष करण्यात माझा मोठा हात होता. त्यामुळेच ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आले. कालांतराने त्यांनी कुरघोडी केली. राजकारण आपल्या जागी आहे. मात्र, फडणवीसांची सुडाची वृत्ती महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अशोभनीय आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केली.
READ ALSO :
“अमोल मिटकरींना निरमा पावडर अन् दुध गिफ्ट पाठवणार,” मिटकरी विरोधात रोहित पवार गट आक्रमक
हेही वाचा…मोठी बातमी…! सरकारकडून छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव शहरांचं नामकरण, परिपत्रकही काढलं
हेही वाचा…“तर केंद्रीय मंत्र्यांच्या दारासमोर कांदे, टोमॅटो फेकल्याशिवाय स्वस्त बसणार नाही”, ‘या’ संघटनेने दिला सरकारला इशारा
हेही वाचा…अबब..! मराठवाड्यासाठी शिंदेंनी दिलं तब्बल ‘इतक्या’ कोटी रूपयांचं पॅकेज, आकडा ऐकून थक्क व्हाल
हेही वाचा…“शासन आपल्या दारी, पैसे उधळतंय वाऱ्यावरी, मोर्चेकरी दारावरी, सरकार झाडतंय बंदोबस्ताच्या फैरी”