सातारा : राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर आमदार अमोल मिटकरी आणि आमदार रोहित पवार यांच्यात सातत्याने धुमचक्री बघायला मिळत आहे. मिटकरी सातत्याने रोहित पवारांवर टिका करत असल्याने रोहित पवार गट आक्रमक झाला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्याच्या ओबीसी विभागाचे प्रदेश सचिव समीर कुडची यांनी अमोल मिटकरी यांचा समाचार घेतला आहे.
हेही वाचा…मोठी बातमी…! छत्रपती संभाजीनगर अन् धाराशीव शहाराच्या नामांतरणाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
अमोल मिटकरी यांची पवारांवर बोलण्याची लायकी नसल्याचे सांगत त्यांनी अमोल मिटकरी यांच्या अकोल्यातील घरी निरमा पावडर आणि दुध कुरीयने पाठवत असल्याचे सांगितले आहे. तसेच या निरमा पावडर आणि दुधाने मिटकरी यांनी स्वत; चे चारित्र स्वच्छ करून घ्यावे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
हेही वाचा…उद्धव ठाकरे हेच सर्वोत्तम मुख्यमंत्री ! सर्व्हेत ठाकरेंना जनतेची पसंती, शिंदेंना फक्त ३.९० तर फडणवीसांना ६.७६ टक्के पसंती
दरम्यान, आमदार अमोल मिटकरी हे शरद पवार यांच्यामुळे आमदार झाले आहेत. अगोदर ते इकडे-तिकडे भाषणे देत फिरत होते, त्यांना पवारांच्या कृपेने आमदारकी मिळाली. आता त्यांच्याच नातवांवर ते बोलत आहेत. तेव्हा आम्हांला एवढेच सांगायचे आहे, त्यांनी स्वत : च चारित्र्य स्वच्छ करून घ्यावे, असं समीर कुडची यांनी सांगितले आहे. ते कराड येथे माध्यमांशी बोलत होते.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी…! सरकारकडून छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव शहरांचं नामकरण, परिपत्रकही काढलं
हेही वाचा…“तर केंद्रीय मंत्र्यांच्या दारासमोर कांदे, टोमॅटो फेकल्याशिवाय स्वस्त बसणार नाही”, ‘या’ संघटनेने दिला सरकारला इशारा
हेही वाचा…अबब..! मराठवाड्यासाठी शिंदेंनी दिलं तब्बल ‘इतक्या’ कोटी रूपयांचं पॅकेज, आकडा ऐकून थक्क व्हाल
हेही वाचा…“शासन आपल्या दारी, पैसे उधळतंय वाऱ्यावरी, मोर्चेकरी दारावरी, सरकार झाडतंय बंदोबस्ताच्या फैरी”
“तुम्ही अडीच वर्ष माशा मारत होतात का ?”, फडणवीसांचा ठाकरेंना खोचक सवाल