सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत ज्या दिवशी माझा पराभव झाला, त्याच दिवशी माझ्या विरोधात कट करस्थान करणारे नाचले, हे सर्वांनी पाहिलंय. मला गुंडगिरी करायची असती, तर मी गोव्यापासून सावंतवाडी ते अगदी जिथं-जिथं उमेदवार होते तेथून मी उचलले असते. परंतु, ते माझ्या रक्तातच नाही. शेवटपर्यंत माझ्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश का केलं नाही, कारण त्यांनी मनापासून केलंच नाही, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी भाजप आमदार व सहकार पॅनलचे सहकारी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव न घेता केला आहे.
ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; नाना पटोले घेणार मंत्रिपदाची शपथ?
सातारा जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणुकीत जावळी तालुका सोसायटी मतदारसंघात संघातून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक ज्ञानदेव रांजणे यांचा एक मताने विजय झाला असून आमदार शशिकांत शिंदे यांना पराभवाचा धक्का बसला होता. या निकालानं जिल्ह्यात राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. या निवडणुकीत 49 मतदानापैकी आमदार शिंदे यांना 24 मते मिळाली, तर विजयी उमेदवार रांजणे यांना 25 मते मिळाली होती.
३२ जिल्ह्यांतील १०५ नगरपंचायतींच्या निवडणुकांचा रणसंग्राम: २१ डिसेंबर रोजी होणार मतदान
खासदार शरद पवार माझी नेहमीच समजूत काढतात, कारण पवार साहेब आहेत म्हणून मी आहे. मी राष्ट्रवादीचा सच्चा पाईक असून, मरेपर्यंत पवारसाहेबांची साथ सोडणार नाही. आता मी मोकळाच आहे. त्यामुळे सातारा, जावळीसह सर्व तालुक्यांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी फिरणार असल्याचे आमदार शिंदेंनी काल सांगितलं होतं. आज यावरती पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली आहे.
Read Also :
- एसटी कर्मचाऱ्यांचा पण गिरणी कामगार करणार का? संजय राऊतांचा हल्लबोल
- खोत-पडळकरांनी आंदोलन सोडलं, पण आंदोलक एसटीची घंटी वाजू देणार नाही..
- फरार घोषित केलेले परमबीर सिंग अखेर आले समोर; मुंबईत दाखल झाल्याची माहिती
- नवाब मलिक यांनी झईदा वानखेडे यांचा मृत्यूचा दाखला ट्विट करत पुन्हा माजवली खळबळ
- मोठी बातमी: आझाद मैदानावरील एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन मागे, सताभाऊ खोत यांची घोषणा