नाशिक : साधेपणाने कार्यक्रम कर, असं मी सरोज आहेर यांना सांगितलं होतं. नारळ फोडायचा आणि गाडीत बसायचं, असं सरोज म्हणाली. पण इथे किती नारळ आहेत बघा” असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांचे कान टोचले. अजित पवारांनी नाशिक दौऱ्यात रस्ते निर्मितीच्या कामांचं भूमिपूजन केलं.
केंद्रीय मंत्रीमंडळात देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागण्याची शक्यता?
नाशिकमधील देवळाली विधानसभा मतदारसंघात ५१ कोटी रुपयांच्या रस्ते निर्मिती कामांचं भूमिपूजन करुन अजित पवार यांनी कुदळ मारली. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह आमदार सरोज अहिरे, दिलीप बनकर आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. “आम्हीच नियम बनवायचे, मग आम्ही नियम पाळले पाहिजेत. न्यायालयाने मध्यंतरी विचारलं की राज्यात मोर्चे कसे काय निघात आहेत. मागच्या वेळेस सिंहस्थ झाला आणि कोरोना वाढला.” याकडे अजित पवारांनी लक्ष वेधलं.
कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा निकाल आज ठरणार; ‘या’ गावांची मतमोजणी पहिल्या फेरीतच
“कोरोना काळात डॉक्टर, नर्स जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. आमदार सरोज अहिरे यांचे पती देखील डॉक्टर आहेत. त्यांना देखील डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा. सरोज अहिरे यांच्या कामाचा उत्साह मी पाहतो आहे. पत्रकारांना विनंती आहे, आमदार सरोज अहिरे यांचा उल्लेख यापुढे विकास कन्या म्हणून करा.” असंही अजित पवार म्हणाले.“गावच्या सरपंचालाच सिक्युरिटीने अडवलं. ज्याला मान सन्मान दिला पाहिजे, त्यांची काही वेळेस अडचण होते. ज्याला येता आलं नाही त्यांची माफी मागतो.” असं म्हणत कार्यक्रमाला उपस्थित राहता न आलेल्यांची अजितदादांनी माफी मागितली.
देवळाली विधानसभा मतदार संघातील विविध कामांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सहभागी झालो. यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री @ChhaganCBhujbal व अन्य मान्यवर उपस्थित होते. pic.twitter.com/9LbUCO2pwc
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 1, 2021
काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गणेश गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल
“पवार साहेब ५० वर्षांपासून जनतेत आहेत. आज आपण कृषी दिन साजरा करतो आहोत. पण केंद्राविरोधात ७ महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकार त्यांच्याकडे ढुंकून बघायला तयार नाही. शेतकऱ्यांना त्रास होता कामा नये आणि शेतकऱ्यांच्या हिताचं बिल विधिमंडळात आम्ही आणणार आहोत. शेतकऱ्यांना फसवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईची देखील तरतूद आहे.” असं अजित पवारांनी सांगितलं. “मी ५ कोटी क्रीडा संकुलासाठी जाहीर करतो. अनिल, बारामतीकडे कमी लक्ष दिलं तरी चालेल पण इथे जास्त लक्ष दे” असा सल्ला अजितदादांनी आपल्या स्वीय सहाय्यकाला दिला. “मी राज्याचा उपमुख्यमंत्री असलो तरी माझ्या मतदारसंघात मी ६ वाजता कामावर असतो. सगळे अधिकारी मला टरकून असतात” असं अजितदादा मिश्किलपणे म्हणाले.
Read Also :
- विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आवाजी मतदान घेण्याचे संकते – संजय राऊत
- अजित पवार, अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा, भाजपकडून थेट अमित शाहांना पत्र
- ठाकरे सरकारचा लसीकरणाबाबत मोठा निर्णय! केंद्र सरकारवर अवलंबून राहणार नाही
- “भाजपाने कुणा-कुणाची जात काढली, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती, त्यांनी मला शहाणपणा शिकवू नये!”
- ‘या’ ६ मुद्यांवर ईडीला करायची अनिल देशमुखांची चौकशी! आता बजावणार तिसरे समन्स