मुंबई : ईडीकडून शुक्रवारी १०० कोटी वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूरमधील निवास्थानी धाडी टाकण्यात आल्या होत्या. यावेळी अनिल देशमुख यांचे खाजगी सचिव संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना ईडी कार्यालयात नेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर रात्री उशीरा त्यांना अटकही करण्यात आली. त्यांच्या चौकशीत अनेक महत्त्वाची माहिती उघड झाल्यानंतर, देशमुख यांना समन्स बजावून, चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले होते.
“अनिल देशमुखांना होणार अटक? ईडीला मिळाले सर्व पुरावे” याचिकाकर्त्या वकिलाने केला दावा
मात्र, “ईडीने २५ जूनला समन्स बजावून मला दुसऱ्या दिवशी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. ईसीआयआरमध्ये उल्लेख केलेली कागदपत्रं मी प्रतिनिधींकडून पाठवत आहे. आजही (२९ जून) मी स्वतः चौकशीसाठी हजर राहू शकणार नाही. माझं वय ७२ वर्ष आहे, आजारपण आणि कोरोना होण्याच्या धोक्यामुळे मी हजेरी लावू शकत नाही. त्याऐवजी माझा जबाब ऑनलाईन रेकॉर्ड करा. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मी जबाब नोंदवेन. मात्र त्याआधी ईडीने प्रश्नांची कॉपी पाठवावी” अशी मागणी अनिल देशमुखांनी पत्राद्वारे केली आहे. तसेच, अनिल देशमुख यांच्या वकीलांनी ईडीकडे ८ दिवसांची मुदत मागितली आहे.
माझं वय झालयं, मी चौकशीला येवू शकत नाही; अनिल देशमुखांचे ED ला पत्र
दरम्यान, अनिल देशमुख यांना मुदत देण्याबाबत ईडीने अजून कोणताही निर्णय घेतला नसून, आता ईडीडकडून त्यांना लवकरच तिसरे समन्स बजावून, चौकशीला हजर राहण्याच्या सूचना दिल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून ,मिळत आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपात, ईडीने देशमुख यांना त्यांच्या, सर्व प्रकारच्या मालमत्तेच्या तपशिलासोबत इतर ६ मुद्द्यांवर सविस्तर तपशील मागितला असून, संबंधित आवश्यक कागदपत्रांसोबत पुढच्या चौकशीला हजर राहण्याची सूचना, ईडीकडून त्यांना करण्यात आली आहे.
‘साहेब शिवसेना वाचवा, माझ्या मोठ्या साहेबांचा शिवसैनिक वाचवा’ कट्टर शिवसैनिकाने फोडला टाहो
या ६ मुद्द्यांत, अनिल देशमुख आणि त्यांच्या नातेवाइकांच्या नावावर असलेली एकूण जंगम व स्थावर मालमत्ता, गेल्या ५ वर्षांचा आयकर परताव्याचा तपशील, नागपुरातील श्री साई शिक्षण संस्थेचा तपशील, ५ वर्षांत जमा झालेली देणगी व एकूण निधी, खासगी सचिव संजीव पालांडे-स्वीय सहायक कुंदन शिंदे, यांच्याशी झालेल्या व्यवहाराचा तपशील, दोघांशी झालेल्या संभाषणाबाबतचे तपशील, त्याबद्दलच्या नोंदीची सविस्तर माहिती, अशा गोष्टींची माहिती मागण्यात आली आहे.
Read Also :
- अशीच तत्परता राज्यपाल, १२ आमदारांच्या नियुक्त्यांसंदर्भात कधी दाखवणार?
- “मी खासदारकी सोडली, विधानसभा अध्यक्षपदाची खुर्ची सोडली; त्यामुळे मला खुर्चीची चिंता नाही”
- चित्रा वाघ यांच्यावर भाजपने सोपवली आणखी एक मोठी जबाबदारी!
- पावसाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवा, राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- कन्येने दिले उत्तर, “पात्रता पेक्षा जास्त मिळालं की असं होतं”; आता पडळकरांचे प्रत्युत्तर