मुंबई : “माझ्या हातात सूत्र द्या, ओबीसींची गेलेलं आरक्षण मिळवून देतो, नाहीतर राजकारणातून संन्यास घेतो”, असं वक्तव्य फडणवीसांनी, नागपूरमध्ये ओबीसी आरक्षणासाठी भाजपने ‘चक्का जाम’ आणि ‘जेल भरो’ आंदोलन केलं. त्यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करताना केलं होतं. त्यावर काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी, “फडणवीस असंही म्हणाले होते, वेगळा विदर्भ झाल्याशिवाय आपण लग्न करणार नाही, त्याचं काय झालं?”, असा सवाल करत टीका केली होती.
आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होते, थोरातांच्या कन्येची पडळकरांवर टीका
‘महसूल मंत्री’ पदाच्या रस्सीखेचामुळं काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा पिल्यासारखे बरळू लागले आहेत… मुळात मा. देवेंद्रजी फडणवीसांचे लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्षाअगोदरच झाले आहे, याचेही भान यांना राहिले नाही. @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra#MahaVikasAghadi pic.twitter.com/00vKB8Q7G4
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) June 28, 2021
यावर, भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करत, थोरात यांच्यावर, “महसूल मंत्रीपदाच्या रस्सीखेचामुळं काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा पिल्यासारखे बरळू लागले आहेत. मुळात देवेंद्र फडणवीसांचे लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्षाअगोदरच झाले आहे, याचेही भान यांना राहिले नाही.” अश्या हीन शब्दांत टीका केली होती.
“वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यँत लग्न करणार नाही, फडणवीस म्हणाले होते, त्याचं काय झालं?”
यांनतर त्यांच्या या टीकेला थोरातांच्या कन्या, शरयू देशमुख यांनी ट्विटरवरच जोरदार प्रत्युत्तर देत, “पात्रते पेक्षा जास्त मिळाले की असंच होतं. आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होती. असो, ज्याचे त्याचे संस्कार..!’ असं म्हटलं आहे.
पात्रता पेक्षा जास्त मिळाले कि अस होत. आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होती. असो, ज्याचे त्याचे संस्कार..! https://t.co/KhFuxuQOSe
— Sharayu Deshmukh (@SharayuDeshm) June 29, 2021
“…तर मी राजकारणातून संन्यास घेईन”, फडणवीसांचं ठाकरे सरकारला थेट आव्हान
दरम्यान, याला आता पडळकरांनी, आज सोलापुरात बोलताना प्रत्युत्तर दिले असून, “काही घराणे अतिसुसंस्कृत आहेत. मी शिक्षकाचा मुलगा आहे. त्यामुळे मला सुसंस्कृतपणा माहिती आहे. तुमच्या विरोधात बोललं की असंस्कृतपणा दिसतो का? मला सुसंस्कृतपणा तुम्ही शिकवू नका”, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.
Read Also :
- ‘राष्ट्रवादीच्या उथळ शहराध्यक्षांचा खोटारडेपणा अखेर उघड; त्या बैठकीचे निमंत्रण दोन तासआधी WhatsApp वर
- आंबील ओढा कारवाईशी माझा काय संबंध?; अजित पवार
- पुणे महापालिकेतील २३ गावांबद्दल महत्वपुर्ण निर्णय; शाळा, जमिनी, अंगणवाड्यांचा असा होणार बदल
- गोरगरिबांच्या घरांवर बुलडोझर फिरवताना, महापौर काय झोपा काढत होते का?
- विधानसभा अध्यक्षपदासाठी आ. संग्राम थोपटे यांचे नाव आघाडीवर