पुणे : उपमुख्यमंत्री कार्यालयात पुण्यातील प्रश्नांबाबत आयोजित बैठकीला गैरहजेरीवरुन पुण्याचे महापौर, भाजप नेते मुरलीधर मोहोळ आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. “राष्ट्रवादीच्या उथळ शहराध्यक्षांनी खोटं बोलून पुणेकरांची करत असलेली दिशाभूल थांबवावी” असं जोरदार प्रत्युत्तर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरवरुन दिलं आहे. आमदार सुनील टिंगरे यांनी स्वतः फोन करुन महापौरांना बैठकीचं निमंत्रण दिलं होतं. मात्र, त्यांनी आपल्या घरी काकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं, असा दावा राष्ट्रवादीने केला होता.
गोरगरिबांच्या घरांवर बुलडोझर फिरवताना, महापौर काय झोपा काढत होते का?
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी सकाळी एकामागून एक १२ ट्विट करत आपल्यावरील आरोप खोडून काढले आहेत. “राष्ट्रवादीच्या उथळ शहराध्यक्षांनी खोटं बोलून पुणेकरांची करत असलेली दिशाभूल थांबवावी ! राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रसिद्धीसाठी इतके पिपासू झाले आहेत, की गेल्या चार वर्षातील ‘अडगळी’चा बॅकलॉग त्यांना लगेचच भरून काढायचा आहे. म्हणूनच वाट्टेल ते बोलायचं, चर्चेत येण्याचा प्रयत्न करताना लोकांची नेहमीप्रमाणे दिशाभूल करायची, ही त्यांची नेहमीची वृत्ती पुणेकरांनी चांगलीच ओळखली. म्हणूनच की काय २०१७ साली ते महापौर असताना त्यांच्या पक्षाला पुणेकरांनी झिडकारुन लावले.” अशी टीका मोहोळ यांनी केली.
आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होते, थोरातांच्या कन्येची पडळकरांवर टीका
राष्ट्रवादीच्या उथळ शहराध्यक्षांनी खोटं बोलून पुणेकरांची करत असलेली दिशाभूल थांबवावी !
राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रसिद्धीसाठी इतके पिपासू झाले आहेत, की गेल्या चार वर्षातील 'अडगळी'चा बॅकलॉग त्यांना लगेचच भरून काढायचा आहे. pic.twitter.com/RhsCbfvHcH
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) June 30, 2021
“मूळ मुद्दा असा की, मंत्रालयात पालकमंत्री अजित पवार यांच्या बैठकीला महापौर म्हणून महापौर कार्यालयाला निमंत्रण बैठकीआधी दोन तास WhatsApp वर मिळाले. शहराच्या महत्त्वाचा विषयावर नियोजित बैठक, प्रश्न सर्व महापालिकेशी निगडित आणि निमंत्रण कशावर… तर व्हॉट्सअॅपवर ! उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून २५ जूनला जे पत्र प्रसिद्ध करण्यात आलं त्यात महापौर म्हणून बैठकीला अपेक्षित आहेत, असा कुठेही उल्लेख नव्हता. याचाच अर्थ ‘महापौर’ म्हणून मला या बैठकीचे निमंत्रण नव्हते. दरम्यानच्या काळात प्रिंट मीडिया आणि बैठकीच्या दिवशी सकाळी ‘महापौरांना मंत्रालयातील बैठकीला डावललं’ अशा बातम्या इलेक्ट्रॉनिक मीडियात झळकल्या. त्यानंतर लगेचच महापौर कार्यालयाला एक दिवस आधीच्या तारखेचे (२८ जून) पत्र बैठकीच्या दोन तास आधी (२९ जून, सकाळी ११ वाजता) पत्र व्हॉट्सअॅपवर मिळाले.” असा दावा मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे.
यावेळी मी मुठा या मुळशी तालुक्यातील गावी माझ्या आई-वडिलांसमवेत होतो. बैठकीला आपल्याला निमंत्रण नाही, याची खात्री झाल्यावरच मी मुठा गावाला जाण्याचे नियोजन केलं. ज्या ठिकाणाहुन फोनवर बोलताना व्यवस्थित रेंज येत नाही. तिथून अचानकपणे ऑनलाईन सहभागी व्हायचं? बरं बैठकीचा अजेंडा काय?
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) June 30, 2021
शिवसेना नागपूर जिल्ह्यात एकटी पडली, स्वतंत्रपणे लढावे दोन्ही काँग्रेस नेत्यांची इच्छा
“यावेळी मी मुठा या मुळशी तालुक्यातील गावी माझ्या आई-वडिलांसमवेत होतो. बैठकीला आपल्याला निमंत्रण नाही, याची खात्री झाल्यावरच मी मुठा गावाला जाण्याचे नियोजन केलं. ज्या ठिकाणाहून फोनवर बोलताना व्यवस्थित रेंज येत नाही. तिथून अचानकपणे ऑनलाईन सहभागी व्हायचं? बरं बैठकीचा अजेंडा काय? कोणकोणते विषय आहेत? त्या विषयाची सर्वांगीण आणि सद्यस्थितीची माहिती कधी आणि किती वेळात घ्यायची? बैठकीला कोणत्या विषयानुसार काय भूमिका असावी? याबाबत विचारायला करायला किमान वेळ तरी मिळू नये?” असा सवाल मोहोळ यांनी विचारला आहे.
पुणे महापालिकेतील २३ गावांबद्दल महत्वपुर्ण निर्णय; शाळा, जमिनी, अंगणवाड्यांचा असा होणार बदल
“पुण्यातील दर शुक्रवारी होणाऱ्या अजितदादांच्या सर्व बैठकांना हजेरी लावून समन्वय साधला आहे. असं असताना पुणे शहरासाठी महत्वाची असणारी बैठक आपण का टाळू? तरीही आपल्याला डावलून का होईना शहराच्या विकासासंदर्भात बैठक होतेय, याचं आपण स्वागतच केलं. पुणे शहरासाठी कोण झटतं? कोण काम करतं? संकटकाळात कोण घरात आणि कोण रस्त्यावर होतं? याची जाण पुणेकरांना नक्कीच आहे. विद्यमान शहराध्यक्षांच्या नेतृत्वाखालील त्यांच्या पक्षाला पुणेकरांनी २०१७ ला खड्यासारखं बाजूला केलं. त्यामुळे ही बनवेगिरी राष्ट्रवादी शहराध्यक्षांनी आता तरी थांबवावी, अन्यथा पुणेकर आपल्याला येत्या महापालिका निवडणुकीत तोंडी लावायलाही ठेवणार नाहीत.” असा घणाघातही महापौरांनी केला.
Read Also :
- आंबील ओढा कारवाईशी माझा काय संबंध?; अजित पवार
- गोरगरिबांच्या घरांवर बुलडोझर फिरवताना, महापौर काय झोपा काढत होते का?
- अहमदनगर: महापौर पदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे तर उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश भोसले बिनविरोध
- नाहीतर तिसरी लाट येण्याआधी दुसरी लाट उलटेल, मुख्यमंत्र्यांनी दिला गंभीर इशारा
- ‘साहेब शिवसेना वाचवा, माझ्या मोठ्या साहेबांचा शिवसैनिक वाचवा’ कट्टर शिवसैनिकाने फोडला टाहो